पीएम किसान सन्मान निधी योजना, पी एम किसान योजनेचा १९ वा हप्ता या तारखेला लाभार्थी शेतकऱ्याच्या बँकेत जमा होणार

पीएम किसान सन्मान निधी योजना
पीएम किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी यांना ६ हजार अनुदान थेट बँकेत जमा होते , या लेखातून जाणून घेऊ कि किसान सन्मान योजनेचा १९ हप्ता कधी जमा होणार आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत याची माहिती खाली दिलेली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

पीएम किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान सन्मान निधी योजना विषयी थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी PM- Kisan योजना म्हणून ओळखली जाते. सदरील योजना संपूर्ण भारतात १ डिसेंबर २०१८ साली लागू झाली. या योजनेंअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासनामार्फत देत बँकेत DBT मार्फत जमा केले जातात . हे ६ हजार ४ महिन्याच्या अंतराने प्रति तीन महिन्याला २ हजार बँक खात्यात जमा केले जातात .

केंद्र सरकारने PM- Kisan योजनेच्या सुरुवातीला प्रति २ हेक्टरपर्यंत शेतजमीन स्वतःच्या मालकीच्या असलेल्या शेतकऱ्याचा समावेश या योजेनेमध्ये केला होता . परंतु पुढील कामात PM- Kisan पीएम किसान सन्मान निधी योजना ची व्याप्ती वाढवण्यात आली व देशातील सर्व शेतकऱ्याचा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. ( आता शेतकऱ्याकडे कितीही जमीन असली तरीही तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.)

पीएम किसान सन्मान निधी योजेमधून कुणाला वगळण्यात आले

राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, सरण्यायधीश इत्यादी , आजी -माजी लोकप्रतिनिधी आमदार , खासदार , महापौर ,आजी-माजी सरकारी कर्मचारी , आयकर भरणारी व्यक्ती डॉक्टर , इंजिनियर , वकील , सनदी लेखापाल , वास्तुरचनाकार यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत

पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अशा प्रश्न नेहमीच पडतो कि पीएम किसान सन्मान निधी योजना लाभ घेण्यासाठी नेमकी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत. पती पात्र असेल तर पत्नी सुद्धा पात्र असेल का ? तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकरी म्हणजेच या मध्ये महिला आणि पुरुष दोन्ही चा समावेश आहे. त्याचबरोबर ज्याच्या नावे भोगवताधार वर्ग १ ची जमीन आहे ते सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . जर कुटुंबामध्ये ४ एकर जमीन असेल आणि पती च्या नावे २ एकर आणि पत्नी च्या नावे २ एकर जमीन असेल तर दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येईल .

भोगवटादार म्हणजे काय भोगवतदारचे प्रकार किती पडतात

पी एम किसान योजनेचा १९ वा हप्ता या तारखेला लाभार्थी शेतकऱ्याच्या बँकेत जमा होणार

विश्वसनीय सूत्रांकडून असे सांगितले जात आहे कि , पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २१ फेब्रुवारी २०२५ रोजी देशातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. केंद्र सरकार मार्फत लवकरच याबाबतची अधिकुत घोषणा केली जाईल .

या लेखमधून “पैसे कमवायचे मार्ग” टीमच्या लेखनातून पीएम किसान सन्मान निधी योजना , पी एम किसान योजनेचा १९ वा हप्ता या तारखेला लाभार्थी शेतकऱ्याच्या बँकेत जमा होणार   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप” – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top