
Sarpanch Salary Hike : गावातील सरपंच व उपसरपंच यांना प्रतीमहिना मानधन देण्यात येते परंतु हे मानधन खूपच कमी असल्याने त्यामध्ये बदल करणे आवशयक होते म्हणून दिनांक २४ सप्टेंबर २०२४ च्या जी आर नुसार या सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती.
घोषणे नंतर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता नुकताच दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने या वाढीव मानधनासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून खाली वाढीव मानधन व शासनाच्या जी आर ची लिंक दिली आहे.
सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ Sarpanch Salary
महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणी आणि आझाद मैदान येथील आंदोलनावेळी मा. मंत्री (ग्राम विकास ) यांनी सरपंच व उपसरपंच मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनानुसार आणि सध्याच्या वाढत्या महगाईचा विचार करून त्याच बरोबर सरपंच आणि उपसरपंच यांच्या कर्तव्यात झालेल्या वाढीचा विचार करून मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खालील तक्त्यानुसार सरपंच आणि उपसरपंच याच्या मानधनात वाढ होईल.
ग्रामपंचायतींची लोक्संख्यानुसार वर्गवारी | सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम | उपसरपंच दरमहा मानधन रक्कम | सरपंच नवीन अनुदानाची रक्कम | उपसरपंच नवीन अनुदानाची रक्कम |
० ते २००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती | 6000/- | 2000/- | 4500/- | 1500/- |
2001 ते 8000 पयंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती | 8000/- | 3000/- | 6000/- | 2250/- |
8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती | 10000/- | 4000/- | 7500/- | 3000/- |
सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ
- त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायतीमधील एकूण लोकसंख्या 2000 पर्यंत आहे, अश्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचे मानधन 3000 रुपयावरुन 6000 रुपये करण्यात येणार असून. उपसरंपच यांचे मानधन रुपये 1000 वरुन 2000 रुपये करण्यात येणार असल्याचे शासनाच्या GR मध्ये मनुद केले आहे.
- त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 2001 ते 8000 पर्यंत आहे, ग्रामपंचायतीच्या सरपंच याचे मानधन 4000 रुपयावरुन 8000 रुपये करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन 1500 रुपयावरुन 3000 रुपये करण्यात आले आहे.
- आणि ज्या ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या 8001 पेक्षा जास्त आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन 5000 रुपयावरुन 10000 रुपये करण्यात आले आहे. सोबात उपसरपंचाचे मानधन 2000 रुपयावरुन 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे असे जाणकार सागतात.
सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ GR | येथे क्लिक करा |
अश्याच माहितीसाठी आमच्या what’s Group ला जॉईन करा | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
या लेखमधून “पैसे कमवायचे मार्ग” टीमच्या लेखनातून सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ पहा नवीन शासनाचा जीआर Sarpanch Salary व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group –“शासकीय नोकरी & योजना ग्रुप” – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- आपल्या जमिनीचा ऑनलाइन सातबारा बघणे सहज शक्य आहे आणि मोबाइलवरून अगदी काही मिनिट काढू शकता
- Ladki Bahin Yojana : गुड न्यूज,लाडक्या बहिणींना ह्या दिवसापासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी मंजूर, 1500 की 2100 मिळणार?
- “399 पोस्ट ऑफिस योजनेमध्ये करा गुंतवणूक आणि मिळावा ₹10 लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना बीमा कवर!”
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मधून किती मिळू शकते कर्ज वाचा पूर्ण माहिती annasaheb patil karj yojana
- गॅस एजन्सीचा मालक भारतात किती पैसे कमवतो? जाणून घ्या,गॅस वितरणाचा व्यवसाय कसा सुरू करायचा?