योजना दूत शासन निर्णय मुख्यमंत्री योजनादूत रोजगाराची संधी मिळणार दरमहिन्याला पगार वाचा शासनाचा GR

आज या लेखामधून तुम्ही शासनाच्या नवीन एका योजनेबद्दल माहिती मिळवणार आहात. या योजनेमधून महाराष्ट्र शासन एका नवीन पदाची नियुक्त तुमच्या गावात करणार आहे  आणि त्या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास प्रतिमहिना १० हजार रोख पगार मिळणार आहे. तर त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री योजनादूत. आज आपण या लेखामधून या जाऊन घेणार आहोत कि संपूर्ण महाराष्ट्र किती पदे भरले जाणार आहेत. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कसा करा करू शकता आणि कोण-कोणते  कागदपत्रेआवश्यक आहेत. सोबत महाराष्ट्र शासनाचा GR पण आहे त्यामुळे लेख  पूर्ण वाचा आणि आजच आपली नोदणी पूर्ण करा.

योजना दूत शासन निर्णय

तुम्ही जर उच्च-शिक्षित बेरोजगार असाल तर तुम्हाला हि एक सध्या आहे ह्या  योजनादूतास शासन देणार आहे प्रतिमहिना भरघोस मानधन मिळणार आहे  सोबत तुम्हाला शासकीय यंत्रणेमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळत आहे, या मुखमंत्री योजनादूत म्हणून महाराष्ट्रातील  प्रत्येक गावामध्ये  १ व्यक्तीची निवड योजनादूत म्हणून निवड  होणार आहे. महाराष्ट्रामध्ये ५० हजार योजनादूत निवडले जाणार असून त्या साठी शासनांनी निवड प्रणाची व्यवस्था तयार केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात आहे ह्या योजनेस दिनांक ९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रतील ५० गावामध्ये आणि शहरामध्ये ५० हजार मुख्यमंत्री योजनादूत ची नियुक्ती करण्यात येणार आहे हे योजनादूत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांचा प्रचार-प्रसार करून जास्तीत जास्त लोकांना त्या योजनांचा लाभ कसा होईल यावर काम करणार आहेत.

योजना दूत शासन निर्णय
योजना दूत शासन निर्णय

मुख्यमंत्री योजनादूत नियुक्तीनंतर किती मानधन मिळेल ?

  • सदरील मुख्यमंत्री योजनादूत  ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात प्रत्येक 5000 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड शासनामार्फत केली जाणार असून त्याची जबाबदारी जबाबदारी माहिती  व जनसंपर्क  महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री योजनादूत निवड झाल्यानंतर दर महिल्याना १० हजार मानधन मिळणार आहे . ( या मध्ये प्रवास भत्ता व इतर सर्व  भत्ते सामाविस्त असतील , १० हजार व्यतिरिक्त इतर कोणतीही रक्कम मिळणार नाही )
  • हि नियुक्त सध्याच्या GR नुसार निवड झाल्यापासून पुढील ६ महिन्याची राहील.
  • सध्याच्या GRनुसार ६ महिन्याची नियुती  करार कोणत्याही परीस्थितीत वाढणार नाही याची अर्जदार व्यक्तीने नोद घ्यावी.

मुख्यमंत्री योजनादूत पात्रता

योजनादूत अर्ज करताना निवडीचे पात्रता निकष समजून घेणे अत्यंत गरजचे आहे.

  •  अर्जदार उमेदाराची वयोमयादा १८ ते ३५ वयोगटातील असावा. त्यापेक्षा जास्त वय असेल तर तो उमेदवार अर्ज करू शकणार नाही.
  •  अर्जदार उमेदवार कमीत कमी पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे. अंशकालीन पदवीधर अर्ज करण्यास पात्र असतील ( अंशकालीन पदवीधर कुणास म्हणावे )
  • संगणक ज्ञान आवश्यक आहे त्यासाठी तुमची MSCIT किंवा CCC कोर्स पूर्ण झालेला असावा.
  • अर्जदार उमेदवार महाराष्ट्र राज्यातील उमेदवार असावा. ( त्यासाठी चे रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे )
  • अर्जदार उमेदवार कडे अद्यावत मोबईल ( स्मार्ट फोन ) असते आवश्यक आहे.
  • उदेवाराचे आधार कार्ड त्याचा बँक खात्याशी जोडलेले असावे ( तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे कि नाही )

वरील सर्व बाबी मध्ये तुमची पात्रता असेल तर तुम्ही योजनादूत म्हणून अर्ज करण्यास पात्र आहात.

मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी सादर करावयाची कागदपत्रे

  • शासनाच्या विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत साठी ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्याची प्रत.
  • अद्यावत आधार कार्ड ची पत्र
  • पदवी उत्तीर्ण असल्याबाबची पुरावा , कागदपत्र / प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • वैयत्तिक बँक खात्याचा तपशील ( पासबुक ची सत्यपत्र )
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हमीपत्र ( ऑनलाईन अर्जसोबतच्या नमुन्यामधील
मुख्यमंत्री योजनादूत नेमके कोणती कामे करणार योजना दूत शासन निर्णय
  • योजनादूत ज्या जिल्ह्यात त्याची निवड आणि नेमणूक झाली आहे त्या जिल्हयातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्हयातील सर्व योजनांची माहिती समजून घेतील.
  • प्रशिक्षित योजनदूतांची त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरून दिलेले काम पूर्ण करणे त्यांच्या साठी बंधनकारक राहील.
  • योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजन्ची प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती पोहचेल यासाठी पर्यन्त करतील.
  • योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा शासन मार्फत दिलेल्या विहित नमुन्यात अहवाल तयार करून तो ऑनलाइन उपलोड करतील.
  • योजनादूत त्यांना सोपविलेल्या जाबबादरीचा स्वतच्या स्वार्थासाठी कामासाठी उपयोग करणार नाहीत. योजनादूत तसे करताना आढळून आल्यास तत्काल त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल व तत्काल त्याचा करार रद्द करून त्याला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
  • योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन मिळणार नाही यांची नोंद घ्यावी.
  • योजनादूत यांचा करार फक्त 6 महिन्याचा राहील तो कोणत्याही कारणास्तव वाढणार नाही त्याचबरोबर एकदा तुम्ही योजनादूत म्हणून 6 महीने काम केल्यास तुम्हाला पुनः योजनादूत म्हणून कोणत्याही जिल्ह्यात काम करता येणार नाही.
  • योजनादूत म्हणून तुम्ही 6 महीने कार्यकाल पूर्ण केल्यास तुम्हाला त्याचे अनुभव प्रमाणपत्र मिळेल की नाही या वर शासनाने अजून काही सांगितले नसून पुढील काळात त्याविषयी अधिक माहिती मिळाली तर आपल्या वेबसाइट च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवली जाईल.

जिल्हा आणि राज्य स्तरावर कामकाज कसे चालेल

  • उपसंचालक ( माहिती . जिल्हा अधिकारी जिल्हा सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधि यांची जबाबदारी.
  • विभागीय स्तरावर विभागीय संचालक / उपसंचालक / उपसंचालक महिती या योजनेचे सनियंत्रण करतील. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या कार्यांचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल.
  • जिल्हा माहीती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबधित जिल्ह्याचा नोडल अधिकारी असेल.
  • संबधित जिल्हयातील योजनदूतांनी शासनानी विहित नमुन्यात आपला रीपोर्ट ऑनलाइन उपलोड केल्यानंतर त्याचा आढावा नोडल अधिकारी घेतील.
  • त्यामुळे ज्यांची योजनादूत म्हणून निवड झाली आहे त्यांनी याची काळजी घ्यावी की शासनस्थावर जिल्हा , विभाग आणि राज्य स्थरावरून योजनदूतांच्या कामाचा  मासिक आढावा  घेण्यात येणार आहेत.
  • काम करताना कोणत्याही अडचणी योजनादूत यास येत असतील तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्क साधावा.
मुख्यमंत्री योजनादूत अर्ज प्रक्रिया
  • माहिती  व जनसंपर्क  महासंचालनालय महाराष्ट्र शासनामार्फत पूर्ण छाननी प्रक्रिया पार पडेल. सोबतच शासनाने काही बाह्यसंस्थानासोबत गेऊन निवड प्रकिया पूर्ण करेल.
  • वर नमूद केलेल्या पात्रतेनुसार निवड प्रकिया पार पडेल.योजना दूत शासन निर्णय
  • अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री योजनादूत GR
  • नोदणीसाठी अधिकृत वेबसाईट मुख्यमंत्री योजनादूत 
सारांश

सदरील लेखामधून मुख्यमंत्री योजनादूत याविषयी माहिती देण्यात आली आहे. या योजनेमधून नियुक्त रण्यात येणाऱ्या योजनादूतास किती मानधन मिळेल, त्याची निवड प्रक्रिया कसी असेल व पात्रता व आवश्यक कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top