ब्लॉगरकडून पैसे कसे कमवायचे – आहेत अनेक मार्ग

लोक म्हणतात इंटरनेट ज्या जमान्यात नोकऱ्या खूप कमी झाल्या अनेक मशीन आल्या १० माणसाचं काम एक मशीन करत आहे आज नोकरीच्या अनेक वाटा बंद झाल्या आहेत पण नवीन युगातील अनेक नवीन वाटा सुद्धा या इंटरनेट च्या युगाने दिल्या आहेत. कधीकाळी पुस्तक लिखाण करून ते प्रकाशित करणे आणि लोकांपर्यंत पोहचवणे खूप अवघड आणि खर्चिक बाब होती हेच काय जर तुम्हाला लिखाण मध्ये रुची आहे तुमचे लिखाण चांगले आहे पण त्या कैशल्यं पासून पैसे कमवावे याविषयी जास्त मार्ग म्हणत एव्हाना याविषयी माहिती पण एवढी सहजा सहजी मिळत नव्हती परंतु तुम्ही आज इंटरनेट च्या माध्यमातून तुमचे लिखाण लोकांपर्यंत पोहचवू शकता. एवढंच नाही तर त्यापासून चांगले पैसे सुद्धा कमवू शकता. हा फक्त आवड म्हणून करण्याचे काम नसून तुम्ही तुमचे करिअर म्हणून सुद्धा लिखाणाकडे पाहू शकता. आजच्या लेखातून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत कि ब्लॉगर कडून पैसे कसे कमवायचे आणि पैसे कमवण्याचा एक मार्ग नाहीये तर एकाच ब्लॉगर webiste मधून तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमावू शकता. तुमच्या ब्लॉगमधून कमाई करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि व्यावहारिक पावले कसे उचलावे या विषयी सखोल  माहिती या लेखामधून आम्ही घेऊन आलो आहोत त्यामुळे लेख पूर्ण वाचा. 

ब्लॉगरकडून पैसे कसे कमवायचे 

ब्लॉगिंग विषयी सखोल माहितीच्या तपशीलांमध्ये जाण्यापूर्वी, हे समजून घेणे आवश्यक आहे की ब्लॉगिंग हा केवळ एक छंद नाही तो एक कायदेशीर व्यवसाय असू शकतो. यशस्वी ब्लॉगर अनेकदा त्यांच्या ब्लॉगवर व्यवसायिक मानसिकतेसह माहिती देतात, ब्रँड तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात, प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात आणि विश्वास संपादन करतात त्यातूनच त्यांना पैसे मिळतो.  उदा- असं समजा तुमचे एका मोठ्या शहरात एक दुकान आहे . हे दुकान मेन रोड वर नसून एक छोटयाश्या गळीत छोटस दुकान आहे. जास्त कुणाला माहिती नाही. दुकान नवीन असल्यामुळे जास्त गिराइक येत. त्या दुकानातील माल विकण्यासाठी तुम्ही मार्केटिंग साठी तुमच्याकडे पैसे नाहीत कधी तरी कुणी आलं तर तुम्हीं त्यांना सांगता कि आमच्या दुकानात चांगला माल मिळतो तुम्ही पुन्हा या आणि तुमच्या जवळच्या लोकांना पण सांगा.  पण सर्वात महत्वाचं  तुमच्या दुकानात मिळणारी वस्तू दर्जेदारआहे एखाद गिराइक आलं कि त्याला तुमच्या दुकानातील  वस्तू आवडतात. तो स्वतःही हि पुन्हा येतो आणि त्याच्या ओळखीच्या लोकांनाही सांगतो. त्यामुळे तुमचे ते गळीत असलेलं दुकान चांगलं चालू आहे. आणि तुम्ही चांगले नफा जाणवत आहेत. आता एक गोष्टी लक्षात आली का कि तुम्ही लोकांच्या नजरेत नाहीत तुमचे दुकान मेन रस्त्यावर सुद्धा नाहीये . जास्त लोकप्रिय पण नाही पण तरीही तुमचे दुकान चांगले चालू आहे त्यामागचं कारण आहे तुमच्या मालाची गुणवत्ता. अगदी असच ब्लॉगिंग मध्ये सुद्धा आहे तुम्ही कोणत्या विषयावर काम करत आहेत आणि त्याची गुणवत्ता कशी आहे यावर तुमचा ब्लॉग वर किती लोक येणार आणि किती वेळ देणार यावर सर्व आहे. Google तुमच्या ब्लॉग कडे बारीक नजर ठेऊन असते. त्यामुळे नवीन दुकान उघडत आहेत म्हणजे ब्लॉग चालू करत आहात तर पुढील काही बाबीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे त्यावर अवलंबून आहे कि तुमचे दुकान/ ब्लॉग कसा आणि किती चालेल.   

ब्लॉगरकडून पैसे कसे कमवायचे
ब्लॉगरकडून पैसे कसे कमवायचे

 योग्य विषयीची निवड 

तुमच्या ब्लॉगमधून पैसे कमावण्याची पहिली पायरी म्हणजे एक विषय निवडणे . हा एक विशिष्ट विषय किंवा आवडीचे क्षेत्र असू शकते  ज्यावर तुमचा ब्लॉग लक्ष केंद्रित करेल. आपले विषयांची  निवड करताना पुढील  घटक अतिशय महत्वाचे आहेत. 

  • आवड आणि कौशल्य- तुम्हाला आवड असलेला आणि जाणकार असा विषय निवडा. यामुळे लेखन सोपे आणि अधिक आनंददायक होईल.
  • प्रेक्षकांची मागणी – तुम्ही जो विषय निवडला आहे त्यासाठी  प्रेक्षक आहेत का याची खात्री करण्यासाठी संशोधन करा. Google Trends किंवा कीवर्ड संशोधन सारखी साधने लोकप्रिय विषय ओळखण्यात मदत करू शकतात. त्यामुळे तुम्हाला समजेल कि तुम्ही ज्या विषयावर काम करणार आहात तोच विषय google किती लोक शोधात असतात. 
  • भाषेची निवड – तुम्ही जो विषय निडवला आहे तो कोणत्या भाषेमध्ये चालेल हे निवड सुद्धा गरजेचं आहे. ते तुमच्या कौशल्य वर आधारित आहे जर तम्ही मराठी मध्ये ब्लॉग बनवला तर मराठी वाचकांपर्यत मर्यादित असली आणि तेवढेच लोक तुमच्या ब्लॉग वर येऊन वाचन करतील . सोप्या भाषेत सांगायच झालं तर महाराष्ट्र राज्य पूरता मर्यादीत राही तुम्ही हिंदी मध्ये काम करत असाल आशिया खंड मध्ये तुमच्या ब्लॉग वाचल्या जाईल आणि इंग्लिश मध्ये असेल तर जगात कुठेही तुमचा ब्लॉग वाचल्या जाईल.  आणि त्याचा सरळ परिणाम तुमच्या उत्पन्न वर होईल जेवढे जास्त वाचक तेवढे जास्त कमाईचे मार्ग. 

  ब्लॉग तयार कसा करावा. 

आता एकदा का तुमच्या विषयाची  निवडल्यानंतर, आपला ब्लॉग सेट करण्याची वेळ आली आहे. Blogger.com हे नवशिक्यांसाठी वापरण्यास सुलभ आणि विनामूल्य होस्टिंगमुळे लोकप्रिय व्यासपीठ आहे. प्रारंभ करण्यासाठी याची निवड करू शकता. कारण हे सोपे आहे त्याचबरोबर अगदी मोफत आहे तुम्हाला फक्त तुमच्या डोमेन साठी थोडे पैसे खर्च करावे लागतील आणि तेही करायचे नसतील तर तुम्हाला मोफत डोमेन सुद्धा मिळेल. एकदा का तुम्ही चांगले काम करू लागले तुम्हाला वाटलं आपण आता हे चांगले करू शकतो त्यानंतर तुम्ही होस्टींगर/वर्डप्रेस  वर तुमचा पूर्ण ब्लॉग शिफ्ट / ट्रांसफर करू शकता. आता आपण समजून घेऊ कि blogger.com वर तुमचा ब्लॉग तयार कसा करावा.

  • एक खाते तयार करणे : ब्लॉगर खात्यासाठी तुमच्या जीमेल खात्यावरून साइन अप करा आणि एक ब्लॉग नाव निवडा जे तुमचे स्थान दर्शवते. जर तुमचे जीमेल अकाउंट नसेल तर ते अगोदर तयार करून घ्या व नंतर ब्लॉगर मध्ये जा.
  • तुमचा ब्लॉग डिझाइन निवडा – ब्लॉगरचे मोफत टेम्पलेट वापरून तुमच्या ब्लॉगचे स्वरूप तयार करून घ्या. व्यावसायिक दिसणारा ब्लॉग वापरकर्त्याच्या सहभाग वाढण्यास मदत करतो.
  • तुमच्या विषयी तुमच्या कामाविषयी आवश्यक माहिती पूर्ण भरा जेणेकरून जे वाचक येतील त्यांना समजेल कि तुमच्या ब्लॉग मधून त्यांना नेमकी कश्या विषयी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या विषयी सुद्धा माहिती द्या.
 पोस्ट साठी  वेळापत्रक

ब्लॉगिंग करताना आपल्या लेख/आर्टिकल लिहावे लागतात तुम्ही तुमचे वेगवेळगे आर्टिकल/लेख तयार करून कधीही टाकत असला तर ते google/गूगल ला समजून घेण्यासाठी अवघड जात. वर सांगिल्याप्रमाणे गूगल चे तुमच्यावर सतत लक्ष असते कि तुम्ही काय माहिती टाकत आहात किती वेळा टाकत आहेत ती माहिती तुम्हीची स्वतःहिताची आहे कि तुम्ही दुसऱ्या वेबसाइट वरून घेतली आहे. या वर अतिशय बारीक नजर गूगल ठेऊन असते.  ब्लॉगिंगमध्ये सुसंगतता महत्वाची आहे.तुम्ही तयार केले लेख एक विशिष्ट्य वेळेवरच पब्लिश करा किंवा  पोस्टिंग शेड्यूल करू शकता. , मग ते आठवड्यातून एकदा असो किंवा आठवड्यातून अनेक वेळा. नियमित अपडेट्स तुमच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात आणि तुमच्या ब्लॉगचा SEO( Search engine optimization ) सुधारण्यात मदत करू शकतात.

पैसे कसे कमवू शकता 

आता तुमचा ब्लॉग सुरू झाला असून.आता विविध पैसे कमवण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे.  तुमच्या ब्लॉगवरून पैसे कमावण्याच्या काही प्रभावी पद्धती खाली दिल्या आहेत. 

  • जाहिरात मधून – Google AdSense: ब्लॉगवर कमाई करण्याचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. Google AdSense साठी साइन अप करून, जाहिरातीची परवानगी मिळवू शकता . तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाहिराती प्रदर्शित करू शकता आणि प्रत्येक वेळी कोणीतरी त्यावर क्लिक केल्यावर पैसे कमवू शकता. कमाई वाढवण्यासाठी, रहदारीला आकर्षित करणारी SEO-ऑप्टिमाइझ केलेली सामग्री लिहिण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जेवढे जास्त लोक तुमच्या ब्लॉग वर येतील तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवू शकता.
  • थेट जाहिरात विक्री – तुमचा ब्लॉग जसजसा वाढत जाईल, तसतसे तुम्ही थेट तुमच्या साइटवर जाहिरातींमध्ये स्वारस्य असलेल्या व्यवसायांना आकर्षित करू करता.ते लोक आपोपाप तुमच्या संपर्कात येतील.  तुम्ही त्यांच्या वस्तूची तुमच्या ब्लॉगमधून जाहिरात करण्यासाठी  काही  शुल्क आकारू शकता किंवा तुमच्या ब्लॉगच्या वर येणाऱ्या लोकांच्या संख्येव/ ट्रॅफिक किती पॆसे घ्यावेत ते ठरवू शकता.
  • संलग्न जाहिराती –  संबद्ध विपणनामध्ये उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करणे आणि तुमच्या रेफरलद्वारे केलेल्या प्रत्येक विक्रीसाठी कमिशन मिळवणे समाविष्ट आहे. सुरुवात कशी करायची ते येथे आहे:
  • ॲफिलिएट प्रोग्राममधून पैसे कसे कमवावे –  ॲमेझॉन असोसिएट्स किंवा ShareASale सारख्या तुमच्या विषयाशी  संबंधित संलग्न प्रोग्रामसाठी जुडून सुद्धा पैसे कमवू शकता.  तुमची वेबसाईट/ब्लॉग जर एखाद्या वस्तू विषयी सविस्तर माहिती देणार असले आणि त्याच वस्तू अमेझॉन/amezon वर मिळत असतील तर तुम्ही एक प्रकारे त्याच्या वस्तूची जाहिरात करत आहात तर ॲमेझॉन असोसिएट्स जुडून तुम्ही त्याच्या वस्तूची लिंक तुमच्या ब्लॉग वर टाकून जर लोक तुमच्या माध्यमातून त्या वस्तू विकत घेत असतील तर तुम्हाला कमिशन म्हणून काही टक्केवारी मध्ये पैसे मिळू शकतात.
  •   डिजिटल उत्पादने विकणे – तुमच्याकडे विशिष्ट क्षेत्रात कौशल्य असल्यास, डिजिटल उत्पादने तयार करण्याचा विचार करा जसे की: ई-पुस्तके ,ऑनलाइन अभ्यासक्रम  शिकवण्यायोग्य किंवा थिंकिफिक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करून विक्री करू शकता व चांगले पैसे कमवू शकता.
आपले काम लोकांपर्यत कसे पोचवायचे 

आपली माहिती/ब्लॉग लोकांपर्यत पोहचवण्याचे अनेक प्रभावशाली अनेक मार्ग आहेत त्यापैकी काही खाली दिले आहेत

  • सोशल मीडिया मार्केटिंग – Instagram, Facebook, Twitter आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या ब्लॉगची जाहिरात करू शकता . आकर्षक पोस्ट तयार करा, ब्लॉग लिंक पाठवा. तुमची माहिती/लेख आकर्षक असेल तर लोक वाचतील व तुमच्या ब्लॉग वर येतील. त्यामुळे तुमचे ट्रॅफिक वाढेल.
  • विश्लेषण आणि सुधारणा –शेवटी, तुमच्या ब्लॉगच्या कार्यप्रदर्शनाचा मागोवा घेण्यासाठी Google Analytics सारखी विश्लेषण साधने वापरा. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल कि किती लोक तुमच्या ब्लॉगवर येत आहेत किती वेळ थांबत आहेत त्यांना नेमकं काय वाचायला आवडत आहे त्याचा फायदा असा होईल कि लोकांना जे आडत ते तुम्ही त्याच्या पर्यंत पोहचवण्याचा पर्यंत कराल आणि तुमच्या ब्लॉग/वेबसाईट मध्ये तशी सुधारणा करून आणलं.
  • गूगल/google – तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला तुमच्या ब्लॉग ची कुठेही मार्केटिन्ग करायची गरज नाहीये. सुरुवातीला काही दिवस करावे लागेल पण एकदा का गुगल च्या लक्षात आले कि तुम्ही चांगले / दर्जेदार काम करत आहात तर गूगल स्वतः तुमच्या वेबसाईट ची मार्केटिंग करतो .  जर वर उदाहण दिल आहे आपल्या दुकानात चांगला माल/वस्तू असतील त्या लोकांच्या पसंतीला पडत असतील लोक स्वतः तुमच्या दुकानाची मार्केटिंग करतात तसेच इथेसुद्धा आहे गूगल स्वतः तुमची वेबसाईट लोकांपर्यत पोहचवत google discover च्या माध्यमातून, त्यामुळे दर्जेदार कामावर भर द्यावा ,  लागेल.
निष्कर्ष

तुमच्या ब्लॉगर ब्लॉगमधून पैसे मिळवणे पूर्णपणे शक्य आहे, परंतु त्यासाठी समर्पण, सातत्य आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे. योग्य विषयांची निवड, दर्जेदार सामग्री तयार करून आणि कमाईची प्रभावी धोरणे वापरून, तुम्ही ब्लॉगिंगची तुमची आवड उत्पन्नाच्या शाश्वत स्रोतात बदलू शकता. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळणार नाही, परंतु चिकाटीने आणि सतत शिकण्याने तुम्ही तुमची ब्लॉगिंग उद्दिष्टे साध्य करू शकता.  ब्लॉगिंगच्या शुभेच्छा!

तुम्ही हे वाचलात का ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top