MahaDBT अतर्गत कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतो |महाडीबीटी शेतकरी योजना

mahaDBT महाडीबीटी शेतकरी योजना : Mahadbt (महाडीबीटी) हे महाराष्ट्र सरकारचे ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याचे पूर्ण नाव ‘महा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (Maha Direct Benefit Transfer) आहे. या पोर्टलद्वारे सरकार विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करते. ह्या मुळे शेतकऱ्यांना लवकर योजनांचा फायदा मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का कि नेमक्या कोणत्या आणि किती शेतकरी शासकीय योजनाचा लाभ Mahadbt मार्फत दिल्या जातो. ला लेखातून तुम्हाला ती संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

महाडीबीटी शेतकरी योजना MAHADBT
महाडीबीटी शेतकरी योजना MAHADBT

MahaDBT नेमक काय आहे ?

Mahadbt (महाडीबीटी) हे महाराष्ट्र सरकारचे ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याचे पूर्ण नाव ‘महा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (Maha Direct Benefit Transfer) आहे. या पोर्टल च्या माध्यमातून प्रत्यक्ष पात्र लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या संबधित योजनेचे अनुदान/ योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पूर्वी जेव्हा शेतकरी शेतीशी निगडीत योजनेचा लाभ घेण्यासाटी अर्ज करत असे तेव्हा त्याला मिळणारा लाभ हा संबधित तालुकास्थरावरील कार्यलयात जाऊन लाभ घ्यावा लागत असे , नंतर कार्यलय चेक स्वरुपात लाभ द्यायला सुरुवात केली पण ह्या मध्ये गळतीचे प्रमाण अधिक होते प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत लाभ पोहचत नव्हता. पारदर्शकता कमी होती , माधात्री खूप होते. त्यामुळे 100 लाभ असेल तर लाभार्थी पर्यंत १० रुपये लाभ पोहचत असे. म्हणून महाराष्ट्र सरकार ने Mahadbt नावाचे पोर्टल आणले. ह्या पोर्टल मार्फत महाडीबीटी शेतकरी योजना चा लाभ सरळ लाभार्थी यांच्या आधार सीडिंग बँक खात्यात जमा होतील. तुमचे आधार सीडिंग बँकेत झालेले आहे का? एका मिनिटात चेक करा.

MahaDBT चे फायदे

  • थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT):
    • पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था: DBT अंतर्गत लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात, त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबतो. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आणि विश्वासार्ह बनते.
    • गळती थाबते : अनुदानाची रक्कम मध्येच हरवण्याची किंवा कमी होण्याची भीती नसते. लाभार्थीला त्याचा पूर्ण हक्क मिळतो. म्हणजे 100 टक्के लाभ लाभार्थ्याला मिळतो.
    • वेगवान आणि सुलभ प्रक्रिया : पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत DBT मुळे लाभार्थ्यांना मदत त्वरित मिळते. कागदपत्रांचा झंझट कमी होऊन प्रक्रिया जलद होते. शेतकऱ्यास वारंवार कागदपत्रे उपलोड करायची गरज भासत नाही.
  • सुलभ आणि एकत्रित/सोपी अर्ज प्रणाली:
    • एका व्यासपीठावर सर्व योजना: आता नागरिकांना, विशेषतः शेतकरी आणि विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत हेलपाटे मारण्याची गरज नाही. एकाच ऑनलाइन पोर्टलवर अनेक विभागांच्या योजना उपलब्ध असून त्या सर्व योजनांचा लाभ ते एकाच ठिकाणी घेऊ शकतात.
    • ऑनलाइन सुविधा: अर्जदार स्वताच्या घरून किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाइन अर्ज करू शकतात, ज्यामुळे वेळ आणि मेहनत आणि अतिरिक्त खर्च होणारा पैसा वाचतो.
    • अर्जाचा पाठपुरावा : अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येते, त्यामुळे कार्यालयात वारंवार भेट देण्याची गरज नाही. परिणामी प्रवासाचा पैसा आणि वेळ वाचतो.
  • शेतकऱ्यांसाठी विशेष लाभ:
    • शेतकऱ्यांसाठी: बियाणे, खते, कृषी अवजारे, आणि ठिबक किंवा तुषार सिंचन यांसारख्या सुविधांसाठी अनुदान मिळवणे आता सोपे आहे. एकाच अर्जाद्वारे अनेक कृषी योजनांचा लाभ घेता येतो.
    • आधार क्रमांकाद्वारे लाभार्थ्यांची खात्री केली जाते, ज्यामुळे फक्त पात्र व्यक्तीलाच लाभ मिळतो आणि बनावट लाभार्थ्यांना रोखले जाते.
    • एकाच व्यक्तीला एकाच योजनेचा वारंवार लाभ घेण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे होणारा गैर व्यवहार कमी होईल.
  • तक्रार निवारण आणि सहाय्य:
    • अर्ज करताना किंवा लाभ मिळवताना काही अडचण आल्यास पोर्टलवर तक्रार दाखल करण्याची किंवा मदत मागण्याची सुविधा उपलब्ध आहे. अजर्दार स्वः फोन करू संबधित समस्याचे निवारण करून घेऊ शकतो.

MahaDBT काम कसे करते

  • नोंदणी : लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर आधार क्रमांकाचा वापर करून स्वतःची नोंदणी करावी लागते. त्यावेळी तुम्हला 1, 2 वेळा आधार OTP ची मागणी होऊ शकते. नोदणी करताना तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र उपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणे: नोंदणी प्रकिया पूर्ण केल्यानंतर, लाभार्थी आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. एकदा का तुम्ही लोगिन केली कि तुम्ही पात्र असलेल्या सर्व योजनांची यादी तुमच्या समोर येईल.
  • सुरुवातीला Mahadbt वर लोगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर वापरल्या जात असे पण एप्रिल २०२५ पासून शेतकरी आयडी असणे आवश्यक आहे.
  • पडताळणी: संबंधित विभागाकडून अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज प्रकिया पूर्ण करता येते.

महाडीबीटी शेतकरी योजना

अनूयोजनांचे नावविभाग
1कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानकृषी यांत्रिकीकरण
2राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
3राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
4एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
5राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
6प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)सिंचन साधने व सुविधा
7राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
8राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
9मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
10राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूसबियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते
11राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
12एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानफलोत्पादन
13भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
14राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
15मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
16बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
17डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
18राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
19मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
20डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनासौरकुंपण
MahaDBT अधिकृत वेबसाईटची लिंक येथे क्लिक करा
शेतकरी आयडी काढण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

या लेखमधून “पैसे कमवायचे मार्ग” टीमच्या लेखनातून अल्पभूधारक शेतकरी योजना ज्यामधून शेतकरी लाभार्थ्याला मिळेल चांगला लाभ!   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप” – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

सर्वाधिक वाचलेले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top