कुटुंबातील मृत व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे आहेत का? आता शोधा UDGAM पोर्टलवर!

एखाद्या जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन झालं, आणि त्यांचं बँकेतील काही आर्थिक व्यवहार, ठेवी, किंवा FD बद्दल कुटुंबीयांना माहितीच नसते. परिणाम काय? ते पैसे बँकेतच पडून राहतात वर्षानुवर्षे.कधी वाटतं का की आपल्या जुन्या खात्यात, किंवा आई-वडिलांच्या नावावर असलेल्या खात्यात काही पैसे राहून गेले असतील? खूप वेळा अशी उदाहरणं समोर आली आहेत जिथे वडील गेले, पण त्यांच्या मुलांना माहितीच नव्हती की त्यांनी कुठे FD केली आहे. किंवा एखाद्या माणसाने बदललेल्या पत्त्यावरून बँकेशी संपर्क हरवला – आणि त्याचे पैसे ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ म्हणून बँकेत पडून राहिले. अशा लाखो-कोटींच्या रक्कमा देशभरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये विसरल्या गेलेल्या अवस्थेत आहेत. पण ही रक्कम आता तुम्ही परत मिळवू शकता. RBI ने सुरू केले आहे एक खास पोर्टल – UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access Information). चला तर मग, पाहूया UDGAM ह्या पोर्टलचा वापर कसा करायचा आणि अनक्लेम्ड डिपॉझिट परत कसे मिळवचे?

UDGAM पोर्टलवर विसरलेले पैसे कसे शोधावेत?
UDGAM पोर्टलवर विसरलेले पैसे कसे शोधावेत?

UDGAM पोर्टल म्हणजे काय?

UDGAM म्हणजे “Unclaimed Deposits – Gateway to Access Information”. हे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सुरू केले आहे. या पोर्टलचा उद्देश म्हणजे – ज्या लोकांचे पैसे बँकेत विसरले गेले आहेत किंवा अनक्लेम्ड अवस्थेत आहेत, त्यांचा शोध घेण्याची एक सोपी आणि पारदर्शक पद्धत उपलब्ध करून देणे. पूर्वी असे पैसे शोधण्यासाठी वेगवेगळ्या बँकांच्या शाखांमध्ये जावे लागत होते, विविध अर्ज करावे लागत होते. पण आता, एकाच पोर्टलवरून – फक्त नाव आणि काही मूलभूत माहिती टाकून – आपण पाहू शकतो की आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर कुठल्या बँकेत विसरलेले पैसे आहेत का.

UDGAM पोर्टलची वैशिष्ट्ये:

  • एकाच ठिकाणी सर्व बँकांचे डाटा सर्च करता येतो
  • फ्री मध्ये वापरता येणारे सरकारी पोर्टल
  • वापरायला खूप सोपे आणि मोबाइल फ्रेंडली
  • आता 30 पेक्षा जास्त बँका या पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत

अनक्लेम्ड डिपॉझिट म्हणजे काय?

अनक्लेम्ड डिपॉझिट म्हणजे असे पैसे, जे बँकेत खातेधारकाने दीर्घकाळापासून वापरलेले नाहीत किंवा ज्यावर कोणताही व्यवहार (जसे की पैसे काढणे, भरवणे, अपडेट करणे) झालेले नाहीत.

उदाहरणार्थ:

  • एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी एक फिक्स्ड डिपॉझिट (FD) केली, पण नंतर विसरून गेला.
  • किंवा एखाद्याचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबीयांना खात्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
  • अशा परिस्थितीत बँक तो पैसा ‘अनक्लेम्ड’ (विसरलेला/कोणीही न मागितलेला) म्हणून वर्ग करते.

कधी डिपॉझिट अनक्लेम्ड मानले जाते?

  • 10 वर्षांहून अधिक काळ जर बचत खाते किंवा चालू खात्यात कोणताही व्यवहार झाला नसेल
  • Fixed Deposit (FD) किंवा Recurring Deposit (RD) चे maturity नंतरही जर पैसे घेतले नाहीत, तर ते ही अनक्लेम्ड ठरतात

UDGAM पोर्टलवर पैसे शोधण्यासाठी लागणारी माहिती :

नोंदणी करताना लागणारी माहिती:

  1. पूर्ण नाव (ज्याच्या नावावर पैसे आहेत).
  2. मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी).
  3. ईमेल आयडी (पर्यायी – पण भविष्यकाळात उपयुक्त).
  4. डेट ऑफ बर्थ (जन्मतारीख – खात्रीसाठी).
  5. जुनं किंवा सध्याचं शहर/पत्ता (खातं कुठे होतं हे समजण्यासाठी).
  6. PAN / Voter ID / आधार कार्ड नं. (पर्यायी – जर अधिक खात्री हवी असेल तर).
  7. फक्त नाव टाकून सुद्धा शोध घेता येतो.
  8. खातं कोणत्या बँकेत होतं हे लक्षात असल्यास ते टाकल्यास सर्च आणखी सोपा होतो.
  9. एकावेळी ५ वेगवेगळ्या नावांचे शोध घेता येतात (उदा. स्वतःचे, आईचे, वडिलांचे, आजोबांचे, इत्यादी).

UDGAM पोर्टलवर अकाउंट कसे तयार करावे?

UDGAM पोर्टलवर खाते तयार करणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि ती तुम्ही काही मिनिटांत पूर्ण करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर इंटरनेट ब्राउझर उघडून https://udgam.rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा. ही RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत साइट असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे.

वेबसाइट उघडल्यानंतर “नोंदणी” किंवा “User Registration” हा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि एक पासवर्ड भरावा लागतो. मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाकून तुमची ओळख पडताळली जाते. यानंतर तुम्ही एक मजबूत पासवर्ड तयार करून खाते सुरक्षित करू शकता. एकदा का तुमची नोंदणी पूर्ण झाली की, तुम्ही लगेचच लॉगिन करून पैसे शोधण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.

UDGAM पोर्टलवर विसरलेले पैसे कसे शोधावेत?

सामान्यपणे असं अनेक वेळा घडतं की एखादी व्यक्ती बँकेत एफडी, बचत खाते किंवा इतर काही ठेव करते आणि वर्षानुवर्षे त्याचा उपयोग न करता ती रक्कम तशीच पडून राहते. काही वेळा व्यक्तीचं निधन झाल्यावर त्याच्या घरच्यांना त्या पैशांबाबत माहिती नसते. अशा विसरलेल्या ठेवांसाठी UDGAM पोर्टल खूपच उपयुक्त आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्डचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करता. लॉगिन झाल्यावर “Unclaimed Deposits” शोधण्यासाठी एक पर्याय दिसतो. त्यावर क्लिक करून तुम्हाला संबंधित व्यक्तीचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, शहर किंवा पत्ता आणि शक्य असल्यास बँकेचं नाव अशी माहिती भरावी लागते.

हे लक्षात घ्या की, तुम्ही एका वेळेस पाच वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती टाकून शोध घेऊ शकता. ही सुविधा त्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे ज्यांना त्यांच्या कुटुंबातील आजोबा, काका, मामा यांच्या नावे काही ठेव असल्याचा अंदाज आहे, पण खात्री नाही. माहिती भरल्यानंतर काही क्षणांतच शोधाचा निकाल समोर येतो. जर त्या नावावर पैसे असतील, तर बँकेचं नाव आणि शाखेचं ठिकाण दाखवलं जातं.

पैसे मिळवण्यासाठी लागणारी प्रक्रिया:

जेव्हा तुम्हाला UDGAM पोर्टलवर शोध घेतल्यावर एखाद्या व्यक्तीच्या नावावर ठेव असल्याचं आढळतं, तेव्हा त्यावर दावा करायचा असेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्ही त्या संबंधित बँकेशी थेट संपर्क साधावा लागतो. पोर्टलवर केवळ माहिती मिळते, प्रत्यक्ष पैसे मिळवण्यासाठी बँकेशीच संपर्क करावा लागतो.

जर मूळ खातेदार अजूनही जिवंत असेल, तर त्याने स्वतः ओळखपत्र आणि खाते संबंधित माहिती घेऊन बँकेत जावं. पण जर ती व्यक्ती मृत झालेली असेल, तर त्यांचे वारसदार त्यावर दावा करू शकतात. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, नातं सांगणारं कागदपत्र, आधार किंवा पॅन कार्ड आणि UDGAM वर मिळालेल्या माहितीचा पुरावा सोबत घेऊन जावं लागतं. बँक ही सर्व कागदपत्रं पडताळते आणि खात्री पटल्यावर काही दिवसांतच ती रक्कम संबंधित वारसदाराच्या खात्यात वर्ग करते. ही प्रक्रिया बँकेनुसार थोडीफार बदलू शकते.

हे हि वाचा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top