अल्पभूधारक शेतकरी योजना ज्यामधून शेतकरी लाभार्थ्याला मिळेल चांगला लाभ

अल्पभूधारक शेतकरी योजना :- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गासाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी यांचा सुद्धा समावेश आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि काही विशेष योजना फक्त अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठीच राबवल्या जातात या लेखातून अल्पभूधारक शेतकरी योजना विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे .

Aplbhudharak shetkari yojna maharashtra , shelipalan yojna , sharad pawar gram samrudhi yojna
अल्पभूधारक शेतकरी योजना

अल्पभूधारक शेतकरी योजना

  • अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे किती जमीअसते?
    • अल्पभूधारक शेतकरी (Small farmers) ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा जास्त मात्र 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत क्षेत्र असलेल्या  शेतकरी हे अल्प भूधारक शेतकरी या गटात मोडतात

शेळीपालन अनुदान योजना

  • शेळीपालन अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने मराठवाड्याच्या पॅकेजच्या धरतीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद( धाराशिव ) यवतमाळ, गोंदिया तसेच सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड व भंडारा या जिल्ह्यांसाठी विशेष शेळ्या आणि दोन बोकड म्हणजे शेळी पालन योजना अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने केली होती. आता सदरील योजना सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली आहे .
  • सदरील योजनेमधून अल्पभूधारक शेतकरी लाभार्थ्यास अनुदान मिळते. पशुपालन,शेळीपालन,मेंढीपालन हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.यातच शेळीपालन सारख्या चांगले उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता 75% पर्यंत अनुदान दिले जाते .

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

महाराष्ट्र सरकारने ‘शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना सुरू केली आहे, जी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून राबवली जात असून, या योजनेतून ग्रामीण भागातील शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकाम आणि भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिलं जाणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरत असून, इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा. खाली अर्ज कसा करावा व GR सुद्धा दिलेला आहे. अल्पभूधारक शेतकरी योजना मधील ही महत्वाची योजना आहे.

  • गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम अनुदान
    • यामध्ये 2 ते 6 गुरांसाठी एक मोठा गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान मंजूर केले जाईल.
    • 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मंजूर केल्या जाईल.
  • शेळीपालन शेड बांधकाम अनुदान
    • 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे 20 शेळयांसाठी 98,568 रुपये आणि तीस शेळयांसाठी 1,47,852 रुपये
    • जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात gr मध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • कुक्कुटपालन शेड बांधकाम
    • 100 कोंबड्यासाठी शेड बांधायचं असेल तर 49,760 अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी म्हणजे 99,520 रूपये दिले जाणार आहे.
    • पण जर समजा एखाद्या शेतकाऱ्याकडे 100 कोंबडी/पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणेनं शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी/कोंबड्या आणणे बंधनकारक राहिल. याची अर्जदार व्यक्ति ने नोंद घ्यावी.
  • भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग अनुदान
    • शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे. (विचार करायला गेले तर हे अनुदान खूप कमी आहे )
    • आता या चारही कामांमधील बांधकामासाठी लांबी, रुंदी जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याची माहिती शासन निर्णयात विस्तृत दिलेली आहे.

मशरूम शेती अनुदान मुळे शेतकऱ्याचा चांगला फायदा, A-Z माहिती

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज कसा करावा

  • ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा : अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • अर्ज नमुन्याची माहिती भरा :
    • सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या नावासमोर बरोबरची खूण करा.
    • ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा आणि दिनांक नमूद करा.
    • अर्जासोबत तुमचा सध्याचा फोटो चिकटवा.
  • वैयक्तिक माहिती भरा : अर्जदाराचे स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरा मोबाइल नंबर टाकताना काळजी घ्यावी तो मोबाइल न. आधार कार्ड सोबत जोडलेला असावा. आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
  • कामाचा प्रकार निवडा : अर्ज करत असलेल्या योजनेच्या प्रकारासमोर खूण करा गाय-म्हैस गोठ्याचे काँक्रीटिकरण ,शेळीपालन शेड कुक्कुटपालन शेड,भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • कुटुंबाचा प्रकार निवडा : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब इत्यादी प्रकार निवडा आणि त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जस की तुमचे कास्ट सर्टिफिकेट जोडावे. शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. संबधित कागदपत्रे जोडावे.
  • जमिनीच्या मालकीची माहिती : लाभार्थ्यांच्या नावे जमीन असल्यास सातबारा उतारा, 8-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडावा सोबत लाभार्थी गावाचा रहिवासी असल्याचा त्या गावाचे रहिवाशी प्रमाणपत्र जोडावे.
  • कुटुंबातील सदस्यांची संख्या : 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यसंख्या नमूद करा. गरज भासल्यास कुटुंबातील सदस्याची यादी सुद्धा द्यावी लागेल.
  • घोषणापत्रावर सही/अंगठा : अर्जदाराने घोषणापत्रावर सही किंवा अंगठा करावा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडावीत:
    • मनरेगा जॉब कार्ड
    • 8-अ उतारा
    • सातबारा उतारा
    • ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ
  • ग्रामसभेचा ठराव व शिफारस पत्र : ग्रामसभेच्या ठरावानुसार सरपंच आणि ग्रामसेवकांनी सही केलेले शिफारस पत्र जोडावे लागेल.
  • कागदपत्रांची छाननी : अर्ज व कागदपत्रांची छाननी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांद्वारे केल्या नंतर पात्र लाभार्थ्यांना पोचपावती दिली जाईल.
  • मनरेगा जॉब कार्डची अट : अर्जदाराने मनरेगाचे लाभार्थी असल्याचे जॉब कार्ड जोडणे आवश्यक आहे. ज्यांच्या कडे जॉब कार्ड नाही अश्या अर्जदारस लाभ मिळणार नाही त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून जॉब कार्ड बनवून घ्यावे लागेल आणि त्यानंतर अर्ज करावा लागेल.

महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी योजना 2 आहेत सोबत इतरही योजनाचा लाभ अल्पभूधारक शेतकरी घेऊ शकतात.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना GRशासन निर्णय
What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्जाचा नमूना अर्जाचा नमूना

या लेखमधून “पैसे कमवायचे मार्ग” टीमच्या लेखनातून अल्पभूधारक शेतकरी योजना ज्यामधून शेतकरी लाभार्थ्याला मिळेल चांगला लाभ!   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप” – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top