प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 :- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकरी लाभार्थी हेक्टरी 13000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचे शासन दरबारी दिसून आली. अशा कठीण परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी महसूल व वन विभागा मार्फत ही महत्त्वाची पाऊले उचलल्याचे दिसून येते.
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांच्या कारणाने होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून उभारण्यासाठी मदत करते. 2024-25 या वर्षासाठी या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
- नवीन पिकांचा समावेश : या वर्षी या योजनेत अनेक नवीन पिकांचा समावेश करण्यात आला.
- प्रीमियम दर कमी : शेतकऱ्यांना आणखी कमी प्रीमियम दर देण्यात आले. फक्त 1 रुपया प्रीमियम पात्र शेतकऱ्याने भरला.
- जलद प्रक्रिया : दावे निपटारा प्रक्रिया आणखी जलद करण्यात आली असून तत्काल पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे .
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 चे ठळक वैशिष्ट्ये
- प्रति हेक्टर १ ३ ० ० ० रुपयांपेक्षा जास्त अनुदान
- थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत .
- पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक वितरण प्रणाली
- राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना लाभ
- शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई सरकार देईल.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?
शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तेथे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. यामध्ये प्रामुख्याने ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक यांची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अर्ज दाखल करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर होईल .
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 फायदे :-
- आर्थिक मदत :- दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
- थेट लाभ: मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
- पुढील हंगामासाठी मदत :- नवीन पिकांसाठी आर्थिक पाठबळ मिळेल.
- कर्जमुक्ती: कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल
- आर्थिक स्थैर्य: शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल .
महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली आहे. तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचेल आणि त्यांना योग्य वेळेत मदत मिळेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 महत्त्वपूर्ण कागदपत्रे
- ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड इ.
- जमीन ताब्याचे पुरावे
- बँक खाते क्रमांक
- मोबाइल नंबर
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिकृत वेबसाइट | Click Here |
What’s App group | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
या लेखमधून ‘पैसे कमवायचे मार्ग‘ टीमच्या लेखनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 मधून मिळणार आहे हेक्टरी 13000 रुपया पेक्षा जास्त अनुदान व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- Inter caste marriage scheme आंतरजातीय विवाह प्रोत्साहन मिळणार एवढी रक्कम..
- आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
- आपल्या जमिनीचा ऑनलाइन सातबारा बघणे सहज शक्य आहे आणि मोबाइलवरून अगदी काही मिनिट काढू शकता
- फ्यूचर आणि ऑप्शंस ट्रेडिंग म्हणजे काय? जाणून घ्या काय आहे दोन्ही मध्ये फरक !किती पडतात प्रकार !
- आपल्या जमिनीचा ऑनलाइन सातबारा बघणे सहज शक्य आहे आणि मोबाइलवरून अगदी काही मिनिट काढू शकता