भारत देशात अनेक योजना राबवल्या जातात बहुतेक योजेनेमध्ये लाभार्थी यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळतो. हा आर्थिक लाभ कधी दर महिन्याला असतो तर कधी वार्षिक असतो. लाभार्थी पैसा मिळाला की तो ज्या कामासाठी मिळालेला आहे त्यावर खर्च न करता इतर दुसऱ्या कामासाठी खर्च करतो. ह्या मुळे बहुतेक वेळा शासनाच्या दृष्टिकोणांमधून योजना सहल झाली असते पण प्रत्येक्ष गावात जाऊन पाहिल्यावर चित्र काही तरी वेगळच असते. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अशीच एक योजना आताच केंद्र सरकार ने जाहीर केली त्या योजणेच नाव आहे विश्वकर्मा योजना महाराष्ट्र आज या लेखा मधून आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ यात.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र ही योजना केंद्र सरकारने 2024 साली जाहीर केली असून या योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असे आहे. सदरील योजनेचा मुख्य उद्देश हा भारतातील कुशल कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना कारागीरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
सदरील लेखात आम्ही तुम्हाला विश्वकर्मा योजना महाराष्ट्र २०२४ योजना विषयी सविस्तर माहिती , पात्रता , आणि अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती देण्याचा पर्यन्त करणार आहोत.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेविषयी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या योजनेला 2024 याच वर्षी मंजूरी दिली असून , सदरील योजना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) साठी आर्थिक बजेट मंजूर आहे.ह्या योजने अंतर्गत हस्तकला कुशल कामगार यांच्या कामाला प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य आर्थिक नफा व्हावा हा हेतु असून हाताने व मशीन च्या सहाय्याने काम करणाऱ्या हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा किंवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे व बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सोबत हस्त-कलाकार व कारागीरांच्या कामाचा दर्जा उच्चवणे तसेच त्यांची उत्पादन गुणवत्तापूर्ण आणि उत्पादित साधने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, याला प्रोत्साहन देणे.
सदरील योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल सोबत 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. 1 लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय, सदरील योजनाअंतर्गत कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत कोण आहेत हस्त -कलाकार
- सुतार कारागीर (लाकडापासून शेतीच्या कामाच्या, घरगुती वस्तु आणि खेळणी बनविणारा कुशल कारागीर )
- होडी बांधणी कारागीर ( पाण्यातील मानवाला आणि समान वाहून नेण्यासाठी लाकूड , लोकडी वस्तूपासून होडी बनविणारा कुशल कारागीर )
- चिलखत बनवणारे कारागीर (
- लोहार कारागीर ( लोहर एक असा कारागीर आहे जो ग्रामीण भागातील घरातील थोडे खराब झालेल्या घरातील भाडे वापरण्या योग्य बनवतो त्याचबरोबर शेती उपयुगी असलेले साधने तयार करून देतो.
- हातोडी आणि अवजार संच बनवणारे ( शेतीसाठी आणि घरातील अवजारे बनवणारे कारागीर )
- कुलूप बनवणारे कारागीर – ( आपल्या घरातील कुलूप बनविण्यासाठी अतिशय कुशल कारागीर काम करत असतात, अनेक प्रकारची कुलुपे ते बनवत असतात.)
- सोनार ( आपल्या देशातील एकही व्यक्ति असा नसेल की त्याला सोनार माहिती असेल. सोनार हा सोन्याचे दागिने बनवण्याचे अतिशय कुशल काम करतो. )
- कुंभार कारागीर – ( मातीपासून घरातील वापराच्या व खेळणी बनवणार कुशल कारागीर उदा. पाण्यासाठी मटका, भाजीसाठी हांडी आदि
- शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट ,दगड फोडणारे कारागीर
- चर्मकार (पादत्राणे/ चप्पल /बूट बनवणारे कारागीर)
- मेस्त्री कारागीर ( घराचे बांधकाम करणार कुशल कारागीर )
- टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर –
- बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
- न्हावी कारागीर ( डोक्याची केस कापणारा कुशल कारागीर
- फुलांचे हार बनवणारे कारागीर ( माळी )
- धोबी ( कपडे धुणारा कारागीर )
- शिंपी कारागीर
- मासेमारचे जाळे विणणारे कारागीर
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत लाभ मिळवणीसाठी पात्रता
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत वरील 18 क्षेत्रापैकी एका मधील कारागीर असावा.
- अर्जदाराचे वय कमीत-कमी 18 व जास्तीत-जास्त 50 वर्ष असावे.
- अर्जदाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अर्जदार वर नमूद केलेल्या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 140 जातींपैकी एक असणे गरजेचे आहे.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत लाभ मिळवणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड ( आपले आधार कार्ड अद्ययावत असणे गरजेचे आहे , आपल्या बँक खाते सी जोडलेले असावे, आधार आणि पॅन कार्ड लिंक असावे त्याच बरोबर आधार कार्ड ला चालू मोबाइल नंबर लिंक असावा.
- पत्त्याचा पुरावा ( कायमस्वरूपी रहिवाशी पत्ता )
- उत्पन्न प्रमाणपत्र ( वार्षिक उत्पन्नाचा दाखला )
- जात प्रमाणपत्र ( तहशीलदार यांनी मंजूर केलेल प्रमाणपत्र असावे)
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो (2)
- बँक पासबुक ( ज्या बँक खात्यास आपले आधार कार्ड लिंक आहे तेच बँक खाते द्यावे.
- चालू असलेला आणि आधार शी लिंक असलेला मोबाईल नंबर ( आधार आणि मोबाइल नंबर कसा लिंक करावा. ) लिंक वर लिंक करून तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आधार सोबत लिंक करून शकता.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र अर्ज कसा करावा.
वर नमूद केलेले आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या csc सार्वजनिक सेवा केंद्रास भेट द्यावी , हे केंद्र आपल्या ग्राम पंचायत , पंचायत समिति , जिल्हा परिषद , नगर पंचायत , तहशील, जिल्हाधिकारी कार्यालय च्या प्रगणात किंवा जवळच उपलब्ध असतात. त्याच्या कडे अर्ज भरून द्यावा.
याच सोबत तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज सुद्धा करू शकता. लिंक PM Vishwkarma Yojan
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र लाभ
- कर्ज: पात्र कारागीर यांना 3 लाखापर्यंत कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. हे कर्ज 2 टप्प्यामध्ये देण्यात येईल.
- सवलतीचे व कमी व्याज दर: लाभार्थीस व्यवसाय कर्ज 5% च्या सवलतीच्या व्याज दराने दिले जाते, सोबत केंद्र सरकार 8% सबसिडी देणार आहे.
- कर्ज पात्रता :- पहिला टप्पा– व्यवसाय निगडीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना 1 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत . दुसरा हप्ता ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे, मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे त्यांना 2 लाख रुपये उपलब्ध आहेत.
- मोठ्या बाजारपेठे प्रवेश :- कारागिरांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी आणि त्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल.
हे ही वाचा.
- महिलांसाठी खास घरबसल्या करा “होम-बेस्ड बेकरी” व्यवसाय
- लेबर कार्ड चे फायदे काय आहेत ?
- मुख्यमंत्री योजनादूत रोजगाराची संधी मिळणार दरमहिन्याला पगार वाचा शासनाचा GR
- रेशन कार्ड च्या पांढऱ्या,पिवळ्या आणि केशरी रंगाचे काय कारण आहे?
- आपल्या जमिनीचा ऑनलाइन सातबारा बघणे सहज शक्य आहे आणि मोबाइलवरून अगदी काही मिनिट काढू शकता