महाराष्ट्रातील बहुतांश लोकसंख्या आजही खेडेगावात राहते आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीचा एक महत्वचा दस्तऐवज माहिती आहे ज्याला 6/12 म्हणतात. तो सातबारा आपल्याकडे असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक शेतकाऱ्याच्या शेता शेजारी चारही बाजूने दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेत असते आणि बहुतेक वेळा अस दिसून आले आहे की त्यांची शेताच्या बांधवरून किंवा इतर काही कारणावरून त्याच्यात नेहमीच वाद चालू असतात. आणि ते शेतकरी आपली तक्रार घेऊन नेहमीच तलाठी किंवा तहशील ऑफिस ला जास्त असतात. वाद वाढले तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुद्धा जावे लागते. एखादा शेतकरी त्याच्या सातबारावरील जमिनीपेक्षा जास्त जमीन स्वतःकडे असते . तुमच्या नावावर किती जमीन आहे आणि त्या जमिनीची सीमा रेखा काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही की आपल्या जमिनीवर आपल्या शेजऱ्याने अतिक्रमण केले आहे की नाही पण तुम्ही आता तुमच्या शेताचा ऑनलाइन सातबारा अगदी सहज काढू शकता. आपल्या घरी बसून तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयांचे चक्कर मारावे लागणार नाही. अगदी सहज आपल्या मोबाइल वरून आपल्या शेतीचा ऑनलाइन सातबारा काढू शकता व काही वाद असतील तर आपल्या गावातच मिटवू शकता. या लेखातून तुम्हाला डिजिटल सातबारा कसा काढवा त्याचबरोबर तुमच्या कडे तुमचा सातबारा असेल तर त्याचा काय काय फायदा होऊ शकतो आणि त्याचा उपयोग तुम्ही कुठे कुठे करू शकता याविषयी सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
ऑनलाइन सातबारा बघणे चे फायदे digital 7/12
सातबारा दाखला हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा भूमी अभिलेख दस्तऐवज आहे. हे जमिनीच्या विशिष्ट भूभागाविषयी आवश्यक तपशील माहिती सविस्तर प्रदान करतो, ज्यामध्ये सर्वेक्षण क्रमांक, मालकाचे नाव, त्याचा पत्ता , जमिनीचा प्रकार (शेती किंवा बिगरशेती) , जमिनीवर वरील काही अर्ज असल्यास त्याचा तपशील.
पुढील काही महत्वाचा तपशील तुम्हाला सातबारा वर बघायला मिळेल.
- जमिनीचा मालकीची हक्क : हे जमिनीच्या मालकीची हक्क पडताळणी करण्यात मदत करते, मालकीचा दावा करणारी व्यक्ती खरोखरच कायदेशीर मालक आहे की नाही तुम्ही सातबारा पाहून ठरवू शकता. जर त्या संबधित व्यक्तीचे नाव सातबारा वर नसेल तर तो व्यक्ति कायदेशील त्या शेतीचा मालक नाही असे तुम्ही समजू शकता.
- मालमत्तेचे व्यवहार आणि हस्तातरणं : जमीन खरेदी किंवा विक्री करताना, मालमत्तेच्या कायदेशीर हस्तांतरणासाठी 7/12 उतारा आवश्यक आहे. खरेदी / विक्री झाल्यानंतर जुन्या मालकाचे नाव कट करून नवीन मालकाचे नाव चढवणे महत्वाचे असते.
- कर्ज विषयी माहिती : सातबारा उतारा कोणताही प्रकारचे अगोदरचे कर्ज आहे की नाही किंवा कोणत्याही प्रकारची थकबाकी आहे की नाही याविषयी सविस्तर माहिती त्यावर नमूद केलेली असते. त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर सातबारा उतारा जमा करणे अत्यंत गरजेच असते.
- मालमत्तेचा वाद: जमिनीच्या कोणत्याही कारणावरून जर वाद झाला असेल तर 7/12 चा उतारा न्यायालयात तुम्ही पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.
- जमीनिविषयी माहिती :- सातबारा मध्ये तुमच्या नावावर किती जमीन आहे त्याचे क्षेत्रफळ किती आहे आणि ती कोणत्या प्रकारात मोडते या विषयी सविस्तर माहिती दिलेली असते.
इतका महत्वाचा सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला आता शासकीय कार्यालयात म्हणजे तहसील ऑफिस मध्ये जायची गरज नाही तुमच्या गावाच्या किंवा विभागाच्या तलाठी ला सुद्धा भेटायची गरज नाही अगदी काही क्षणात तुम्ही घरी बसल्या तुमच्या जागेचा सातबारा ऑनलाइन सातबारा बघणे शक्य आहे. पुढील दिलेल्या स्टेप चे योग्य पालन करा आणि आपल्या मोबाइल वर तुमच्या जागेचा सातबारा बघा.
ऑनलाइन सातबारा बघणे कसे शक्य आहे ? digital 7/12
आता तुम्ही तुमच्या मोबाइल वरून सुद्धा अगदी सहज सातबारा बघू शकता त्यासाठी तुम्हाला Satbara 7/12 Utara Maharashtra हे मोबाइल अप्लिकेशन तुमच्या मोबाइल मध्ये डाउनलोड करावे लागेल.
- सर्वात वर mahabhumi – महाभूमी असे नाव दिसेल त्याच्या अगदी खाली digital 7/12, 8 अ व मालमत्ता पत्रक पहा या वर दाबून/ क्लिक करून पुढे जा.
- विभागाची निवड – त्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागाची निवड करावी लागेल , अमरावती , छत्रपती संभाजीनगर , कोंकण , नागपूर, नाशिक व पुणे असे विभागाचे नावे असतील व त्याखालोखाल जिल्ह्याची यादी सुद्धा असेल तुमची जमीन ज्या जिल्ह्यात आहेत त्या विभागची निवड करून पुढे जा.
- दस्तएवजाची निवड – या मोबाइल अप्लिकेशन च्या माध्यमातून तुम्ही 3 प्रकारचे कागदपत्रे पाहू शकता 7/12, 8 अ व मालमत्ता पत्रक त्यापैकी 7/12 ची निवड करा.
- जिल्हा निवड – तुमच्या जिल्ह्याची निवड करा.
- तालुका निवड – तुमची जमीन असलेल्या तालुक्याची निवड करा.
- गावाची निवड – तुमची जमीन ज्या गावात आहे त्या गावाची निवड करा.
- गट नंबर , सर्वे नंबर ची निवड करा – तसे तुम्ही तुमच्या नावाची निवड करून सुद्धा तुमचं ऑनलाइन सातबारा बघणे शक्य आहे परंतु त्यामध्ये शोधायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही तुमचं गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून पुढे जा.
- जेव्हा तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकला तेव्हा थोड्या वेळात तुमचं ऑनलाइन सातबारा तुमच्या समोर असेल तुम्ही त्याला बघू शकता सोबत pdf मध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता.digital 7/12
ऑनलाइन सातबारा बघणे website वरून सुद्धा बघू शकतो.
जर digital satbara सही सोबत पाहिजे असल्यास तुम्हाला शासकीय अधिकृत webiste वरून डाउनलोड करावा लागेल त्यासाठी पुढील बाबी माहिती असणे गरजेच्या आहेत सोबत काही विशेष माहिती सुद्धा देणे अपेक्षित आहे.
- सुरुवातीला महाभूमि या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- जर तुमचे खाते नसेल तर स्वतचे एक खाते उघडून घ्या . खाते उघडणीसाठी फक्त 5 मिनिट एवढा कालावधी लागेल
- आपले खाते उघडणीसाठी तुमच्या कडे स्वतचा एक सक्रिय मोबाइल नंबर आणि mail id असणे गरजेचे आहे सोबत तुमचा पूर्ण पत्ता आणि एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे खाते तयार करून घ्या.
- जर तुमचे अगोदरच खाते असल्यास तुम्हाला फक्त लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे खाते उघडावे लागेल. तुमचे खाते उघडले की वरच्या उजव्या बाजूला तुमचे पूर्ण नाव दिसेल.
- तुम्ही या वेबसाइट वरून तुमच्या जागेचे सातबारा . नमूना नंबर 8 आणि फेरफार सही सोबत डाउनलोड करू शकता.
- तुम्हाला कोणते प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्यावर टिक करून पुढील माहिती भर.
- जिल्हा निवड – तुमच्या जिल्ह्याची निवड करा.
- तालुका निवड – तुमची जमीन असलेल्या तालुक्याची निवड करा.
- गावाची निवड – तुमची जमीन ज्या गावात आहे त्या गावाची निवड करा.
- गट नंबर , सर्वे नंबर ची निवड करा – तसे तुम्ही तुमच्या नावाची निवड करून सुद्धा तुमचं ऑनलाइन सातबारा बघणे शक्य आहे परंतु त्यामध्ये शोधायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही तुमचं गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून पुढे जा.
- जेव्हा तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकला तेव्हा थोड्या वेळात तुमचं ऑनलाइन सातबारा तुमच्या समोर असेल तुम्ही त्याला बघू शकता सोबत pdf मध्ये डाउनलोड सुद्धा करू तुमचा digital 7/12 पाहू शकता.
- एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला स्वाक्षरी वाला सातबारा किंवा वर नमूद केलेले कोणतेही कागदपत्र काढायचा असेल तर प्रत्येक कागदपत्र 15 रुपये फीस द्यावी लागेल.
- जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नसतील तर तुम्हाला मोबाइल सारखे रीचार्ज मारून पैसे खात्यामध्ये टाकावे लागतील.
मोबाइल वरून ऑनलाइन सातबारा बघणे शक्य होत नसल्यास तुम्ही सेतु सेविधा केंद्रास भेट देऊन सातबारा काढू शकता सोबत आपल्या विभागाच्या तलाठी कार्यालयास भेट देऊन सुद्धा आपला सातबारा मिळवू शकता सोबत आपल्या तालुका ठिकाणी तहसील कार्यालयात सुद्धा तुम्हाला सातबारा मिळेल. सातबारा पत्र अत्यंत महत्वाचे कागदपत्र असून ते सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
आमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेन्ट करून कळवा.