खरच नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?

आज आपल्या देशात अनेक नेटवर्क मार्केटिंग कंपन्या काय करतात ह्या कंपनी चे एजेंट तुम्हाला लाखों रुपये उत्पन्नाचे उदाहरणे देतात आणि तुम्हाला जोडण्याचा पर्यन्त करतात पण खरच लाखो रुपये किंवा नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का? याविषयी सखोल माहिती देणार लेख खास तुमच्या साठी.

खरच नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?
खरच नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?

नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?

आज आपल्या देशात काही नामांकित नेटवर्क मार्केटिंग कंपन्या जस की ॲमवे इंडिया (Amway India), वेस्टिज मार्केटिंग प्रा. लि. (Vestige Marketing Pvt. Ltd.), मोडिकेअर (Modicare), हर्बालाइफ न्यूट्रिशन (Herbalife Nutrition),मि लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रा. लि. (Mi Lifestyle Marketing Global Pvt. Ltd.), आरसीएम बिझनेस (RCM Business), फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्स इंडिया (Forever Living Products India), आयएमसी (आंतरराष्ट्रीय मार्केटिंग कॉर्पोरेशन) (IMC – International Marketing Corporation), अस्क्लेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड (Asclepius Wellness Private Limited), अटोमी इंडिया (Atomy India) इथे फक्त 10 कंपण्याचे नावे दिलेले आहे पण ह्या पेक्षा खूप जास्त कंपन्या आपल्या देशात आणि राज्यात काम करतात आणि लाखों रुपये उत्पन्न असल्याचे दर्शवितात. मागील 15 वर्षापासून ह्या कंपन्या काम करत आहेत पण खरंच लोकानी नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का? किंवा चांगले पैसे कामवले आहेत का याची माहिती जाणून घ्यायच्या अगोदर हे अजून घेणे गरजेचे आहे की नेटवर्क मार्केटिंग च्या सेमिनार मध्ये सांगितल्या प्रणामे ह्या कंपन्या काम करतात का की ? यांचा काम करण्याचा फॉर्म्युला काही वेगळा आहे त्यासाठी नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का? मधील खालील लेख पूर्ण वाचा.

काय आहे नेटवर्क मार्केटिंग

नेटवर्क मार्केटिंग, ज्याला डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) म्हणूनही ओळखले जाते, हे एक बिझनेस मॉडेल आहे जिथे व्यक्ती थेट ग्राहकांना उत्पादने किंवा सेवा विकतात आणि केवळ त्यांच्या विक्रीसाठीच नव्हे तर व्यवसायात भरती केलेल्या लोकांकडून केलेल्या विक्रीसाठी देखील कमिशन मिळवतात. या नेटवर्क मार्केटिंग चा इतिहास थोडा समजून घेऊ.

1868 च्या काळात अमिरिकेत एक कंपनी स्थापन झाली त्या कंपनी चे नाव होते कॅलिफोर्निया परफ्यूम कंपनी (नंतर एव्हॉन असे नाव देण्यात आले) ही कंपनी हे आपला माल दुकानात जाऊन विकला नाही त्यामागचे कारण होते की प्रत्यक्ष कंपनी मध्ये तयार झालेला वस्तु जर सर्व टॅक्स सहित 10 रुपयात तयार होत असेल तर ठोक होलसेल विक्रेता त्याचे खर्च जोडतो आणि ती वस्तु 15 रुपयाला किरकोळ होलसेल विक्रेत्याला विकतो, किरकोळ होलसेल विक्रेत्या दुकानदाराला ती वस्तु 20 रुपयाला विकतो आणि दुकानदार ती वस्तु गिराहिकस 25 रुपयाला विकतो. ह्या पूर्ण प्रक्रिये मध्ये जेवढा फायदा विक्रेत्याचा झाला आहे तेवढा फायदा कंपनी मालकाचा झाला नाही कारण त्याने खूप मोठे कर्ज काढून कंपनी टाकली, मोठ मोठ्या मशीन विकण घेतल्या असतात, कामगार वर्ग लागून तो माल तयार करतो एवढ सर्व करून त्याच्या वस्तूची किमत 10 रुपये, पण विक्रेता फक्त 2 कामगार लावून आणि थोडा फार पैसा गुंतवून कंपनी मालकपेक्षा जास्त उत्पन्न कामवतो. ह्या सर्व बाबीचा विचार करून आणि अनेक संशोधननंतर काही कंपन्या उदयास आल्या आणि 1868 पासून ह्या कंपण्यामध्ये अनेक बदल झाले. काही कंपनी ची माहिती देत आहे.

  • 1868 – थेट विक्रीची सुरुवात : कॅलिफोर्निया परफ्यूम कंपनी (नंतर एव्हॉन असे नाव देण्यात आले) सारख्या कंपन्यांनी 1800 च्या उत्तरार्धात थेट विक्री सुरू केली.
  • 1930 – पहिले MLM-सारखे मॉडेल: Nutrilite, 1934 मध्ये कार्ल रेहनबोर्ग यांनी स्थापन केलेली आहारातील पूरक कंपनी, बहुतेकदा MLM चे प्रणेते मानले जाते. याने वितरकांची नियुक्ती करण्याची संकल्पना मांडली जी वैयक्तिक विक्री आणि त्यांच्या नियुक्तींनी केलेल्या विक्रीतून कमिशन मिळवतील.
  • 1945 – Nutrilite च्या नेटवर्क सिस्टमचा शुभारंभ : Nutrilite ने एक नुकसान भरपाई योजना तयार केली ज्यामुळे वितरकांना त्यांच्या विक्रीसाठीच नव्हे तर त्यांनी भरती केलेल्या विक्रीसाठी देखील पुरस्कृत केले. यामुळे बहु-स्तरीय विक्री सुरू झाली आणि उत्पन्न वाढले.
    1959 – Amway ची निर्मिती : Jay Van Andel आणि Rich DeVos, माजी Nutrilite वितरक यांनी Amway ची स्थापना केली (‘अमेरिकन वे’ साठी लहान). Amway ने MLM मॉडेलला परिष्कृत केले आणि विविध श्रेणींमध्ये उत्पादनांचा प्रचार करत जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या MLM कंपन्यांपैकी एक बनले. भारतात ह्या कंपनी ने 2000 च्या काळात धमाल केली होती.
  • सोशल मीडिया इंटिग्रेशन :- MLM वितरक आता Facebook, Instagram आणि YouTube सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर उत्पादने मार्केट करण्यासाठी आणि सदस्यांची नियुक्ती करताना दिसत आहेत.
    ई-कॉमर्सकडे शिफ्ट करा :- अनेक कंपन्यांनी अखंड उत्पादन ऑर्डरिंग आणि ट्रॅकिंगसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म एकत्रित केले आहेत.
    साथीच्या रोगाला चालना: COVID-19 महामारी दरम्यान, MLM मध्ये भरतीमध्ये वाढ झाली कारण लोक लवचिक उत्पन्नाचे स्रोत शोधत होते.

खरच नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?

नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का? याचे होय आणि नाही हे दोन्ही आहे ते कसे ते पुढील प्रमाणे पाहू.

नेटवर्क मार्केटिंग ची कल्पना च मुळात डायरेक्ट सेलिंग आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कंपनी मधील वस्तु एक एजेंट द्वारे प्रत्यक्ष ग्राहकास विकायचे जे कमिशन ठोस आणि किरकोळ विक्रेत्यास मिळणार होते ते आता एजेंटला मिळेल. त्यामुळे जो पर्यन्त एजेंट वस्तु विकत राहील तो पर्यन्त त्याला पैसे मिळत राहतील. जर एजेंट जे जास्त वस्तु विकल्या तर त्याला चांगला नफा होऊ शकतो.

पण जर तुम्हाला कुणी अस म्हणत असेल तर तुम्ही नेटवर्क मार्केटिंगला जोडले गेले आणि 1 रूपयाच्या वस्तु विकल्या की तुम्हाला दर महिला 10,20,50 मिळतील तर ते साफ चुकीच आहे. अस कधीही होणार नाही एजेंट ला वस्तु विकल्यावरच कमिशन स्वरूपात पैसे मिळतील. त्यामुळे याचा असा अर्थ होतो मी नेटवर्क मार्केटिंग मधून चांगले पैसे मिळत नाहीत.

या लेखातून आम्ही तुम्हाला “खरच नेटवर्क मार्केटिंग चांगले पैसे देते का?” याविषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे या व्यतिरिक्त या संबधित काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला comment करून कळवू शकता. अशीच माहिती तुम्हाला What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top