Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : या लेखातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार मिळणार याविषयी सविस्तर माहिती देणारा लेख.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची मंजुरी
महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदरच वर्ग DBT द्वारे वर्ग करण्यात करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार आहे हा प्रश्न राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना पडलेला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी पडणार ?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी पडणार ? आज हा प्रश्न सर्वाना पडलेला आहे , नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपये एवढी रक्कम लाभार्थी यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि हा हफ्ता लाभार्थी यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा शेवटी जमा होणार आहे. एक महिन्याची 1500 रुपये एवढी रक्कम महिलांच्या खात्यावर पडणार आहे. आणि पुढील महिन्याचा हफ्ता जानेवारी २०२५ ला भेटणार नाही पण त्यासाठी अजून फंड मंजूर झाला नाही.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल. अस्या प्रकारे दोन टप्प्यात सर्व महिलांना लाभ मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 हफ्ता कधी मिळणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन वाढवून 2100 रुपये एवढी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सुद्धा केले होते कि येत्या काळात 1500 रुपयावरून २१००, त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल.
या लेखातून आम्ही तुम्हाला “Ladki Bahin Yojana : गुड न्यूज,लाडक्या बहिणींना ह्या दिवसापासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी मंजूर, 1500 की 2100 मिळणार? ” याविषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे या व्यतिरिक्त या संबधित काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला comment करून कळवू शकता. अशीच माहिती तुम्हाला What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
तुम्ही हे वाचलत का ?