शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document

व्यक्तीच्या नावे शेती आहे त्या व्यक्तीच्या नावाचे सातबारा ७ /१ २  व नमुना नंबर ८ अ हे कागदपत्रे असतात , पण ह्या दस्तऐवजासोबत अजून एक महत्वाचा दस्तऐवज आहे जो शेतकरी असल्याचा पुरावा असतो तर आजच्या लेखातून आपण शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document याविषयी सखोल माहिती घेणार आहोत .

 शेतकरी असल्याचा दाखला shetkari aslyacha dakhla

आपल्या राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असून राज्यातील जवळपास ७ ०  टक्के लोकसंख्या हि शेती आणि शेतीआधारित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती या व्यवसायाला महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा म्हणतात .  शेतकरी व्यक्तीस आपल्या शेतीवर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी काही दस्तऐवजांची गरज असते हे कागदपत्रे महाराष्ट्र महसूल विभागामार्फत पारित केले जातात , हे कागदपत्रे तुमच्या कडे नसतील तर तुम्हला तुमच्या शेतीवर मालकी हक्क दाखवता येणार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्या सातबारा उतारा ( ७ /१ २  उतारा ) आणि नमुना नंबर ८ अ असणे गरजेचे आहे .  जर तुमच्या कडे हे कागदपत्र नसतील तर चिंता करून नका ( ह्या लिंक वर जाऊन अगदी २  मिनिटात तुमचे सातबारा उतारा ( ७ /१ २  उतारा ) आणि नमुना नंबर ८ पहा व डोवनलॊड करा )

शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document
शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document

जसे सातबारा उतारा ( ७ /१ २  उतारा ) आणि नमुना नंबर ८ अ महत्वाचे आहे तसेच तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला सुद्धा महत्वाचा आहे. कारण ज्या व्यक्तीकडे शेती आहे तो प्रत्येक व्यक्ती शेती हा व्यवसाय करत असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकरी व्यक्तीकडे हा दाखला असणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु हा शेतकरी दाखला किंवा शेतकरी प्रमाणपत्र नेमके कसे  काढावे लागते किंवा त्याची नेमकं अर्ज प्रकिया काय व कशी आहे इत्यादी बद्दल बऱ्याच लोकांना अजून देखील माहिती नसते. सोबतच या कागदाचा काय फायदा आहे हे देखील माहिती असंते म्हणून हा लेखात आहेत शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत .

कुठे मिळेल शेतकरी असल्याचा दाखला 

शेतकरी असल्याचा दाखला काढणे अत्यंत आवश्यक आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि तो दाखला तुम्हाला कुठे मिळेल. आणि त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल चला आज या लेखाच्या माध्यमातून आपण २  सोप्या पद्धतीने आपला शेतकरी असल्याचा दाखला व  shetkari Aslyacha dakhla document समजून घेऊ .

  1. पूर्वीपासून चालत आलेली प्रक्रिया म्हणजे महसूल विभागाच्या कोणत्याही कार्यालयास भेट देऊन आपला शेतकरी असल्याचा दाखल काढणे , आता त्या मध्ये शासनाने थोडा बदल करून तुमच्या गावात किंवा गावाजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्र मध्ये सुद्धा हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सहज सेतू केंद्रातून शेतकरी असल्याचा दाखला काढू शकता .
  2. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचे शेतकरी असल्याचा दाखला काढू शकता अशी व्यवस्था महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केली आहे , त्या व्यवस्थेचे नाव आहे आपले सरकार , आपले सरकार हि एक शासकीय वेबसाइट असून शासन या वेबसाइट च्या माध्यमातून वेगवेगळे आवश्यक शेतीविषयक कागदपत्रे काढण्याची संधी देते. ह्या वेबसाइट वरून तुम्ही सातबारा उतारा , नमुना नंबर ८ अ , सोबत अनेक महत्वाचे कागदपत्रे तुमच्या घरून तुमच्या मोबाईल वरून काढता येतात .
  3. आपले सरकार वरून शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी खालील दिलेल्या लेखातून वाचा.

शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे  shetkari aslyacha dakhala document 

शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document समूजन घेताना हेही माहिती असेल पाहिजे कि कोणते कागदपत्र असणे बंधनकारक आहेत आणि कोणते कागदपत्रे नसतील तरी चालेल.

Proof of identity ओळखीचे प्रमाणपत्र (खालील पैकी कोणतेही एक )

  • आधार कार्ड adhar card
  • पॅन कार्ड pan Card
  • मनरेगा चे जॉब कार्ड NREGA job card
  • पासपोर्ट passport
  • मतदान कार्ड voter id card
  • सरकारी ओळखपत्र -government ID card
  • ड्रायव्हिंग लायसन्स -Driving Licence
  • आरएसबीवाय कार्ड – RSBY card

Proof of Address रहिवाशी पत्ता चे प्रमाणपत्र

  • Passport -पासपोर्ट
  • Ration Card – रेशन कार्ड
  •  Rent Receipt- भाड्याची पावती
  • Telephone Bill -टेलिफोन बिल
  •  Driving Licence- ड्रायव्हिंग लायसन्स
  •  Electricity Bill -वीज बिल
  •  Water charge Bill – पाणी शुल्क बिल
  •  Voter list Extract -मतदार यादी उतारा
  •  Property Tax Receipt -मालमत्ता कर पावती
  •  7/12 and 8-A Extract 7/12 आणि 8-अ उतारा
  •  Property Registration Extract -मालमत्ता नोंदणी उतारा

Other Documents इतर कागदपत्र (कमीतकमी -1)

  • 7/12 and 8-A Extract of respective land 7/12 आणि 8-अ संबंधित जमिनीचा उतारा

Mandatory Documents(सर्व अनिवार्य)

  • Self-Declaration स्व-घोषणा

ऑनलाईन शेतकरी असल्याचा दाखला कसा काढावा 

महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाइट आपले सरकार  जाऊन जर तुम्ही नवीन असाल तर आपली नोंदणी पूर्ण करून आपले खाते तयार करा आणि जर तुम्ही या अगोदर खाते तयार केले असेल तर लॉगिन id आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

नवीन वापरकर्ता असल्या सर्व माहिती भरावी लागेल जस कि तुमचे पूर्ण नाव , मोबाइल नंबर , पत्ता मेल id  इत्यादी , एखादा का तुमचे खाते तयार झाले कि ते कायम स्वरूपी झाले तुम्हला पुन्हा खाते उघडायची गरज नाही फक्त लॉगिन आडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता .

Whats App Group

  • एखादा का तुमचे खाते तयार झाले कि तुम्हाला शेतकरी असल्याचा दाखला shetkari aslyacha dakhla अर्ज करण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या विभागामधून महसूल विभाग ची निवड करून उप – विभागामध्ये सुद्धा महसूल विभाग ची नोंद करावी, त्यानंतर जी तुमच्या समोर काही अर्ज उघडतील त्यामध्ये अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत ,भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला ,डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र ,ऐैपतीचा दाखला,अल्प भु-धारक दाखला इत्यादी सारखे अर्ज चे मेनू ओपन होईल त्यामधून तुम्हाला शेतकरी असल्याचा दाखला वर क्लिक करून पुढे जा या बटनावर दाबायचे आहे त्यानंतर service list  मधून पुन्हा शेतकरी असल्याचा दाखला ची निवड करायची आहे लगेच तुमच्या समोर तुमचा फॉर्म ओपन होईल .
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती पूर्ण भरून काही माफक फीस भरावी लागेल आणि आवश्यक कागदरपत्राचे फोटो उपलोड करावे लागतील आणि अश्या प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

फक्त 15 दिवसात मिलेल तुमचे शेतकरी असल्याचा दाखला

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला  15 दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी असायचा दाखला  मिळेल. काही तांत्रिक अडचणी असल्या  प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन माहिती तपासू शकता.

या लेखातून आम्ही तुम्हाला “शेतकरी असल्याचा दाखला आणि कागदपत्रे shetkari aslyacha dakhla document” याविषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे या व्यतिरिक्त या संबधित काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला comment करून कळवू शकता. अशीच माहिती तुम्हाला What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top