मागील काही महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी मध्ये बदल झाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिळणारी विमा रक्कम होती त्यामध्ये सुद्धा मोठा बदल केला आहे आज या लेखामधून त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना
महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना(पूर्वीची नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) 2 जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्त्वावर काही आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि त्यानंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करून लागू करण्यात आली.ही महत्त्वाकांक्षी योजनेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली होती कालांतराने वेळोवेळी इतर लाभार्थी गटास त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले.
ह्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमधून पात्र कुटुंबास सुरुवातीला 1.5 लाख रुपयाचे मेडिकल कवरेज देण्यात येत होते. तुमच्या कडे जर फक्त पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्ही योजनेशी जोडलेल्या हॉस्पिटल मध्ये जाऊन या योजनेमार्फत विलाज मोफत घेऊ शकता.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 1 ला बदल
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि.23 सप्टेंबर 2018 पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली होती . या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित असून अश्या कुटुंबांना योजनेमार्फत प्रमाणपत्र आणि गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले होते. ही योजना 2018 ते 2020 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यास सुरुवात झाली .सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा 60:40 च्या प्रमाणात आहे.
एकत्रित योजनेत शासनाने दि.26 फेब्रुवारी,2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यासुधारणा नुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.50 लक्ष रकमेचे विमा संरक्षण पुरविले जात होते. तसेच आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5.00 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण लागू होते. सदर योजना दि.1.04.2020 ते दि.30.06.2024 या कालावधीत राबविण्यात आली. (या रकमेमध्ये बदल करण्यात आला आहे त्याची माहिती खाली दिली आहे )
दि.28 जुलै 2023 रोजीच्या महाराष्ट्र सरकारने शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानुसार दि.1 जुलै 2024 पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत असून या योजनेत राज्यातील सर्व लोकसंख्या समाविष्ट करण्यात आला आहे. ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 2 ला बदल
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना जशी केंद्र शासनाने आयुष्मान भारत या केंद्र शासन पुरस्कर्त योजनेशी जोडली तशीच या योजनेमध्ये दूसरा एक महत्वाचा बदल केला आहे. पूर्वी या योजनेमधून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना मधून प्रती कुटुंब वार्षिक 1.5 लाख रुपयाचा मोफत विलाज + 5 लाख रुपयाचे मोफत विलाज आयुष्मान भारत मधून तर एकूण 6.5 लाख रुपयाचा मोफत विलाज प्रती कुटुंब मिळत असे आता बदल होईन.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 2.5 लाख प्रती कुटुंब + आयुष्यमान भारत योजना 5 लाख रुपये असे एकूण 7 लाख रुपयाचा मोफत विलाज प्रती कुटुंब.
योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये
- • महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण (राज्यातील सर्व रहिवासी लाभ घेऊ शकतात. )
- • जे रुग्णालय या योजनेशी जोडलेले आहेत त्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम नसतानाही व्दितीय व तृतीय श्रेणी प्रकारचे उपचार मोफत मिळणार.
- • प्रति वर्ष रु.7.5 लाखांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा कुटुंबातील सर्व सदस्य वापरू शकतात.
- • रुग्णालयात अगोदर दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया/उपचारांच्या वैद्यकीय सेवा विलाजचा लाभ पण या योजनेमधून घेता येणार.
- • योजनेत समाविष्ट असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट करण्यात आले आहेत.
- • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील जे रुग्णालय या योजेनेशी जोडलेले आहे तेथे जाऊन मोफत उपचार घेता येतो.
- • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. कोणतेही बंधन नाही.
- अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आजार यादी
- महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आजार यादी मध्ये नव्याने 328 नवीन आजारांचा समावेश करण्यात आला आहे. आता एकूण 1400 आजारवर अगदी मोफत उपचार मिळेल, आराजांची यादी खाली दिलेली आहे.
- हृदयरोग
- कर्करोग
- मधुमेह
- न्यूरोलॉजिकल आजार
- किडनी आजार
- श्वसनविकार
- डोळ्यांचे आजार
- कानाचे आजार
- हाडांचे आजार
- त्वचारोग
- मानसिक आजार
- शस्त्रक्रिया
- प्रसूती आणि स्त्रीरोग
- बालरोग
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आजार यादी वाढीव विमा व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.