MUHSनाशिक विद्यापीठातून Migration certificate कसे काढावे, B.sc nursing /gnm/anm ?

Migration Certificate म्हणजे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक संस्थेमध्ये उपस्थितीच्या कालावधीची आणि त्याच्या शिक्षणाच्या स्थितीची माहिती दर्शवणारे एक अधिकृत प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र मुख्यत्वे विद्यार्थी एका शैक्षणिक संस्थेतून दुसऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असते.

Migration certificate म्हणजे काय ?

Migration certificate ला स्थलांतर प्रमाणपत्र देखील म्हणतात. हे प्रमाणपत्र शैक्षणिक संस्था (Educational Institution ) किंवा विद्यापीठ मध्ये  (University ) जारी केलेले अधिकृत दसाऐवज आहे. विद्यार्थी एका Institute मधून या, दुसन्या Institute मध्ये  स्थलांतरित झाल्याचा पुरावा म्हणून या प्रमाणपत्राचा उपयोग होतो . हे स्थलांतर (migration) त्याच देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असू शकते.

MIGRATION CERTIFICATE
ANM ,GNM, B.BSC.NURSING

मुख्य उद्देश:

  1. शिक्षणाची प्रमाणिकता:
    • हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या आधीच्या शिक्षणाची खात्री देते आणि त्याचे शैक्षणिक इतिहास प्रमाणित करते.
  2. दुसऱ्या संस्थेत प्रवेश:
    • नवीन शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या संस्थेतून Migration Certificate सादर करणे आवश्यक असते.
  3. विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती:
    • हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडते.

Migration certificate कधी आवश्यक आहे?

  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेतल्यास.
  • उच्च शिक्षणासाठी, जसे की कॉलेज किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी.
  • विदेशात शिक्षणासाठी जाऊन आवेदन करण्यासाठी.

Migration Certificate मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यमान शैक्षणिक संस्थेकडे अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, संबंधित शैक्षणिक संस्था विद्यार्थ्याला Migration Certificate प्रदान करते

स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ ससान्स (MUHS ) नाशिक मधून कसे  मिळवावे ?

मायग्रेशन सर्टिफिकेट  मिळविण्याची  २ पद्धत आहे . MUHS  website (https://www.muhs.ac.in) visit  करा .  त्या वेबसाइट वर तुम्हाला मिग्रेशन प्रमाणपत्र  चा फॉर्म PDF स्वरूपात  दिसेल तो डाउनलोड करावा . तो फॉर्म डाउनलोड  केल्या नंतर फॉर्म भरून, पूर्वी शिक्षण घेत  असलेल्या संस्थे मध्ये जाऊन,मायग्रेशन प्रमाणपत्रासाठी  TC (transfer certificate / Leaving certificate )  मिळणे बाबत असा अर्ज द्यावा आणि त्या संस्थेमधून ओरिजिनल TC घ्यावी परंतु त्या TC वर नमूद करावे कि  TC  only For migration purpose .

तुमची पहिली TC तुम्ही नवीन ऍडमिशन साठी नवीन संस्थेला दिलेली असणार आहे ,म्हणुन तुम्हाला मायग्रेशन  प्रमाणपत्रासाठी कॉलेज मधून दुसरी TC  काढायची आहे आणि हि तुमची दुसरी TC कॉलेज तुम्हाला मिग्रेशन सर्टिफिकेट साठी देईल म्हणून त्यावर नमूद केलेले असेल कि हि TC फक्त मायग्रेशन  साठी घेतली  आहे .

तसेच MUHS वेबसाइट वरून  डाउनलोड  केलेल्या  फॉर्म मध्ये college declation Form आहे , त्यावर प्रिंसिपल  कडून सही आनि कॉलेज चा स्टॅम्प घ्यावा . फॉर्म  भरून आवश्यक कागदपत्र जोडावीत आणि मग मायग्रेशन  साठी फॉर्म  पाठवावा.

Migration Certificate  अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) प्राप्त करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा ( फॉर्म ).
आवश्यक शुल्क भरणा केल्याची मुळ पावती.
महाविद्यालय सोडल्याचे मुळ प्रमाणपत्र (L.C/T.C) पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा अंतीम वर्षाच्या गुणपत्रिकेची (स्वसाक्षांकीत छायापत्र).
कॉलेज  घोषणापत्र (decleration) फॉर्म .
बंधपत्र (बाँड रिलीज प्रमाणपत्र) आवश्यकतेनुसार.
गॅप  सर्टीफिकेट आवश्यकतेनुसार.
नवित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे कागदपत्रे (असल्यास).
स्वघोषणापत्र (Self Declaration Form) आवश्यकतेनुसार.
ओळखपत्र महाविद्यालयाचे ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना / पैन कार्ड / आधार कार्ड (स्वसाक्षांकीत छायापत्र).
इंटर्नशिप कॉम्प्लिशन प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार.

MUHS वेबसाईट  वर ऑनलाइन  पयमेन्ट कशी करावी ?

विद्यापीठाची वेब साईट www.muhs.ac.in वर उपलब्ध असलेल्या लिंकवर ऑनलाईन शुल्क स्विकारल्या जाईन .  किंवा  डिमांड DRAFT करू शकता  .

रोख स्वरुपात शुल्क (Fees) भरणा करता येणार नाही.  

muhs वेबसाईट च्या होम पेज वर ( new payment and old payment option) आहे ,त्या पैकी ओल्ड पेमेंट ऑपशन  हे सिलेक्ट करा .

ओल्ड पेमेंट ऑपशन  – सिलेक्ट केल्यावर एक नव विंडो ओपन होते त्या मध्ये खालील प्रमाणे ओपशन  सिलेक्ट करा .
select year- 2024-2025 ( ज्या वर्षी ऍडमिशन घेताय ते वर्ष सिलेक्ट करा )
Select facury- Allied health Sciences (b.sc नर्सिंग / GNM /ANM  या स्टुडन्ट नि हे सिलेक्ट करा.)
select college type – Muhs Student
select degree course – Post Graduate
select Fee:- Migration certificate. ( या मध्ये २ ऑपशन आहेत  Regular process   त्यात तुम्हाला फीस १५०० आहे ,आणि हे migration  certificate post च्या द्वारे पाठविले जाते आणि MUHS मधून आपण फॉर्म वर दिलेल्या ऍड्रेस वर घर पोहच मिळते .  दुसरे ऑपशन आहे urgent process त्यात
२००० फीस आहे आणि ते स्वतः MUHS   मध्ये जाऊन आणावे लागते )
select Region college – location
select ge college- name.
Name Student -applicant Name
Email ID-
Mobile –
Date of Birth-
Address-
Amount-
Pay now.
Migration certificate .

पोस्टाव्दारे  स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) कसे मागवावे ?

MUHS वेबसाइट वरून  डाउनलोड केलेल्या फॉर्म पूर्ण भरून , त्यावर प्रिंसिपल कडून सही  आणि कॉलेज चा स्टॅम्प घ्यावा .  फॉर्म  भरून आवश्यक कागदपत्र जोडावीत आणि मग  MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHIK  (muhs)  च्या ऍड्रेस वर पाठवावी

Maharashtra University of Health Sciences

Mhasrul, Vani Dindori Road, Nashik-422004

शुल्क दिलेल्या लिंक वर ऑनलाईन भरणा केल्याची पावती जोडून परीपुर्ण अर्ज पाठवावा . त्याच बरोबर  विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये ईमेल आयडी व मोबाईल नंबर अचुक आणि चालू असलेला टाकावा जेणेकरुन अर्जातील त्रुटीबाबत वेळीच कळविण्यात येईल. अर्ज प्राप्त झाल्यापासुन १० कार्यालयीन दिवसामध्ये स्पीड पोस्टव्दारे स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) अर्जामध्ये नमूद पत्यावर पाठविण्यात  येईल.

Urgent  PROCESS  ( By-hand) –

By-hand स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) मिळविण्यासाठ परिपुर्ण भरलेल्या अर्जासोबत विद्यापीठाच्या वेबसाईट वरील लिंक वर ऑनलाईन रु २०००/- (बेळोवेळी सुधारीत आकारणी होणारे शुल्क) शुल्क भरणा केल्याची पावती जोडून स्थलांतर प्रमाणपत्र मिळणेबाबतचा अर्ज पात्रता विभागात उपकुलसचिव / सांख्यिकी अधिकारी / कक्ष अधिकारी यांच्या कडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी  सकाळी ११:३० वाजे पर्यंत सबमिट करावा . त्याच दिवशी दुपारी ३:३० नंतर स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) देण्यात येईल . रोख स्वरुपात शुल्क स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी, स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) स्वहस्ते विद्यार्थ्यास देण्यात येईल.किंवा विद्यार्थ्याने विनंती केल्यास विद्यार्थ्यांचे आई, वडील, सख्खा भाऊ, सख्खी बहीण, यांना प्राधिकृत पत्र व त्यांचे ओळखपत्र अर्जासोबत सादर केल्यास स्वहस्ते स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) उक्त उल्लेखीत व्यक्ती पैकीच (म्हणजे Father, Mother, Real Brother, Real Sister) वितरित केले जाईल.

Migration Certificate विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रवेश घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी या प्रमाणपत्राची आवश्यकता आणि त्याची प्राप्ती प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा   कमवा आणि शिका योजना म्हणजे काय?

हे हि वाचा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top