आज २१ शतकात तुम्ही जर फक्त शेती हा एकच व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही एक गृहिणी आहेत आणि तुम्ही फक्त घरातील कामे करत असाल किंवा फक्त शेतीमध्ये मदत करत असाल ते आजच्या युगाच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही असं म्हणता येईल कारण कोरोना नंतर महागाई भयानक वाढली आहे. तुम्ही गावात राहा किंवा शहरात राहा तुम्हाला प्रत्येक गोष्टी साठी पैसे मोजावे लागतात. पूर्वी शेतीमधून घरातील उपयोगी वास्तूचे उत्पादन घेतल्या जायचे पण आता तसे होत नाही. आता बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन, कापूस, हळद यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तू तुम्हाला बाहेरून विकत घ्याव्या लागतात परिणामी खर्च भयानक वाढला आहे जेवढे उत्पन्न त्यापेक्षा जास्त खर्च असं दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात शेतीबरोबर किंवा तुम्ही एखादी एखादी नोकरी करत असाल त्याबरोबर एखाद्या घरगुती व्यवसायाची जोड जर देता आली तर तुमच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला पैशाची आर्थिक चणचण भासणार नाही त्याचबरोबर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढी च्या शिक्षणासाठी सुद्धा चांगला पैसे उभे करून ठेऊ शकता. आज या लेखातून असे १० व्यवसाय जे घरी राहून करता येतील त्याची संपूर्ण माहिती आणि घरगुती व्यवसाय यादी देण्यात येत आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
घरगुती व्यवसाय म्हणजे काय ?
- घरगुती व्यवसाय किंवा गृह-आधारित व्यवसाय हा एक छोटा व्यवसाय असून जो व्यवसाय मालकाच्या घरातून चालतो जातो. स्थानाव्यतिरिक्त, गृह व्यवसायांची व्याख्या सामान्यत: अगदी काही लोक किंवा एखांदी व्यक्ती हा व्यवसाय चालवत असते .
- घरगुती व्यवसाय म्हणजे काय? तर एखांदी व्यक्ती कोणत्याही कार्यालय , दुकानात न जाता स्वतः जिथे राहते त्या राहत्या घरातून स्वतःचे घरगुती कामे सांभाळून , एक व्यक्ती किंवा एक छोट्या गटाने / समूहाने मिळून केलेला व्यवसाय म्हणजे घरगुती व्यवसाय होय .
घरगुती व्यवसायचे फायदे काय
घरगुती व्यवसाय आजच्या खाडीला सर्वात फायदेशीर छोटा व्यवसाय समजला जातो. घरगुती व्यवसायाचे पुढील फायदे असू शकतात .
- लवचिक वेळापत्रक :- आपण आपल्या वेळापत्रकाचे स्वतः नियोजन करू शकता. आपल्या कुटुंबासह अधिक वेळ घालवता येईल आणि आपल्या स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन करण्याची स्वातंत्र्य मिळेल. ज्या गृहिणी आहेत किंवा तुम्ही नोकरी करत आहेत आणि तुम्हाला तुमच्या फावला वेळ चांगला मिळत असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सवडी नुसार काम करू शकता. घरगुती व्यवसायाचा हा सर्वात मोठा फायदा आहे कि तुमच्या वर वेळेचे कोणतेही बंधन नसेल. आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता .
- कमी गुंतवणूक :- एखादा व्यवसाय उभा करायचा म्हणाला कि सर्वात पडणारा प्रश्न म्हणजे भांडवल , मोठा व्यवसाय करायचा म्हणाल तर भांडवल पण मोठं लागत पण अनेक घरगुती व्यवसाय कमी गुंतवणुक करून सुरु करता येतात. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा आणि साहित्याचा वापर करून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि त्यासाठी तुम्हला जास्त भांडवल सुद्धा उभं करावे लागणार नाही .
- कमी खर्च : घरगुती व्यवसायाचा हा सर्वात मोठा फायदा आहे कि आपल्या घरातून काम करून आपण कार्यालयीन खर्च, प्रवास खर्च आणि इतर अनावश्यक खर्च टाळू शकता. आणि त्यामुळे कमी खर्चात जास्त नफा घरगुती व्यवसायापासून मिळवता येतो .
- तणाव कमी : व्यवसाय म्हणलं कि धावपळ आली , अपार कष्ट आहे परंतु जर तुम्ही घरगुती व्यवसाय करत असाल तर स्वतःच्या मालक असल्याने आपण कमी तणावग्रस्त असाल. आपल्या स्वतःच्या वेळापत्रकाचे पालन करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या वेळेचे नियोजन करू शकता .
- कौशल्यांचा विकास :- तुमच्या छोटा घरगुती व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला व्यवसाय वाढण्यासाठी आपल्याला नवीन कौशल्ये शिकण्याची गरज असते. हे आपल्याला वैयक्तिक विकासासाठी मदत करू शकते. घरगुती व्यवसाय करताना स्वतःला नवीन कौशल्ये शिकायला वाव आणि वेळ मिळेल .
- आर्थिक स्वातंत्र्य : स्वतःचा व्यवसाय यशस्वी झाल्यास आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता. आपण आपल्या स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत तयार करू शकता. स्वतःचा पैसे खर्च करण्याचा तुमच्याकडे स्वतंत्र असेल. हे सर्व स्वतःच्या आणि घरगुती व्यायसायाचे फायदे आहेत . हे फायदे घेण्यासाठी घरगुती व्यवसाय यादी पाहणार आहोत त्यामुळे लेख पूर्ण वाचा.घरगुती व्यवसाय यादी
- रोजगार निर्मिती :- स्वतःचा छोटा जरी व्यवसाय उभा केला तर तुम्ही स्वतःला हि स्वतःहा साठी एक रोजणार निर्माण केला असून आणि जर
- ग्रामीण समुदायाचे सक्षमीकरण
- कमी स्थलांतरण
धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे वाचा पूर्ण माहिती सोबत शासनाचा GR
घरगुती व्यवसाय यादी
- फळे, भाज्या आणि धान्यांची सेंद्रिय शेती
- किराणा स्टोअर उघडणे
- डेअरी/दूध केंद्र उघडणे
- पिठाची गिरणी सुरू करणे
- पॅकेजिंग उत्पादने युनिट
- साबण आणि डिटर्जंट उत्पादन
- डिस्पोजेबल पिशव्या
- मसाला प्रक्रिया युनिट
- हातमाग आणि कापड उत्पादन
- लाकूडकाम आणि हस्तकला फर्निचर
- हस्तकला उत्पादन
- बेकरी किंवा स्नॅक्स उत्पादन
- घरगुती लाडकी वस्तू
- बांबू च्या घरगुती वस्तू
- लाल मिरची आणि हळद चे उत्पादन
घरगुती व्यवसाय यादी वर दिलेली आहे प्रत्येक व्यवसायावर सखोल महिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला सांगू शकता . घरगुती व्यवसाय यादी
हे हि वाचा