आपल्या देशात आर्थिक प्रत्यक्ष आर्थिक लाभाच्या योजना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून सुरूच आहेत .आणि बहुतेक योजना ह्या निवडणुकीच्या काळात जाहीर केल्या जातात ज्यामुळे राजकीय नेत्यांना निवडणुकीत जिंकण्यासाठी होतो. काही काळानंतर त्या योजना बंद होतात. आज जवळच उदाहरण द्यायच झालं तर आताच काही राज्यामध्ये विधानसभेची निवडणुका पार पडल्या त्यामध्ये मध्य प्रदेश राज्य सुद्धा होते. निवडणुकच्या काही महिन्याअगोदरच लाडली बेहेणा योजना ची चालू केल्या गेली महिलाना सरल त्यांचा बँक खात्यामध्ये एक हजार रुपये महिना देण्यात आला. आणि जेव्हा निवडणूका झाल्या तेव्हा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात आली. संपूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. एवढा फरक अश्या योजनेमधून पडतो. आज आपण या लेखामधून अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेच नाव आहे पी एम किसान योजना त्याच बरोबर पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधून कशी बघावी याविषयी सुद्धा समजून घेणार आहोत तर लेख पूर्ण वाचा.
पी एम किसान योजना विषयी थोडस
पी एम किसान सन्मान निधी योजना हा भारत सरकार मार्फत राबवली जाणारी एक योजना असून या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 रोजी मा. नरेंद्र मोदी यांनी केली या योजनेही मुख्य उद्देश हा आपल्या देशातील लहान व कमी जमीन ( अल्पभूधारक ) शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक मदत करणे हा आहे. पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिल्या जातात ज्यामुळे शेतकरी आर्थिक सबल होईल आणि त्यांचे जीवनमान उंचवेल.
पी एम किसान सन्मान योजना मधून शेतकऱ्याचा प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात.
पी एम किसान योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट हे शेतकऱ्यां शेतीमधील योग्य पीक आणि पिकाचे योग्य आरोग्य आणि उत्पादन वाढावे आणि खात्रीशील उत्पन्न होण्यासाठी लागणारे विविध साहित्य जसकी ,खाते , कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पैशांची गरज भासते अश्या वेळी शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जावर अवलंबित्व अवलंबून राहायची गरज भासू नये. हे उदिष्टय डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार पी एम किसान योजना मधून शेतकऱ्याला पैशांची मदत करत आहे.
पी एम किसान योजना प्रमुख वैशिष्ट्ये
- लाभार्थी – या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंब या ची व्याख्या पती , पत्नी आणि अल्पवयीन मुळे यांचा समावेश होतो जसे शासनाच्या बाकी योजेनेमध्ये व्याख्या केल्या जाते अगदी तशीच व्याख्या या योजनेमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. योजनेच्या सुरुवातीला 2 हेक्टर पर्यन्त ( 4 एकर ) लागवणी योग्य जमीन असलेल्या लहान शेतकरी कुटुंबासाठी होती, तथापि जून 2019 मध्ये केंद्र सरकारने देशातील सर्व शतकरी कुटुंबाचा समावेश करून घेतला. सध्या च्या योजनेमध्ये शेतकऱ्यांकडे किती शेती आहे याचा विचार केल्या जात नाही. सर्व शेतकऱ्याना लाभ दिल जातो.
- अपात्र शेतकरी- उच्च-उत्पन्न गटांच्या काही श्रेणींतील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये संस्थात्मक जमीनधारक, सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त झालेले शेतकरी, डॉक्टर आणि अभियंते यांसारखे व्यावसायिक आणि आयकर भरणारे शेतकरी यांचा समावेश आहे.
- अंमलबजावणी: PM-KISAN ही योजना राज्य सरकारांच्या समन्वयाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे लागू केली गेली असून . राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पात्र शेतकरी कुटुंबे सलेक्ट करतात आणि त्यांचे तपशील पडताळणी आणि पेमेंट प्रक्रियेसाठी PM-KISAN पोर्टलवर अपलोड करतात.
योजनेमधून मिळणार लाभ
पीएम किसान सन्मान योजनेमधून शेतकरी लाभार्थीना ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी अश्या शेतकरी बांधवांना आर्थिक लाभ मिळतो. याच योजनेमधून राज्य शासनाचा पण निधी मिळतो. नेमका किती निधी मिळतो त्याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.
- पीएम किसान सन्मान योजनेमधून प्रती तीन महिन्यासाठी 2 हजार एकूण 6000 हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहे.
- त्याचबरोबर तेवढीच रक्कम राज्य शासनाकडून 6000 रुपये मिळत आहेत.
- या मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा वापर शेतकाऱ्याना शेतीतील कामासाठी करावा असे शासनाला अपेक्षित आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना साठी अर्ज कसा करावा
या पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित देशातील इच्छुक शेतकरी लाभार्थींनी खाली दिलेल्या पद्धतीचे पालन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारे अर्ज करावा.
- सर्व प्रथम, अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पीएम किसान योजना
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर मुख्यपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर उघडेल.
- या मुख्य पृष्ठावर आपल्याला “शेतकरी कॉर्नर” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा , त्याचबरोबर तुम्हाला या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.
- यापैकी तुम्हाला “नवीन शेतकरी नोंदणी” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
- या उघडलेल्या फॉर्ममध्ये आपल्याला आपला आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि विचारलेल्या सर्व माहिती पूर्ण आणि योग्य माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करून पुढे जावे लागेल.
- तुमच्या आधार शी लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर एक OTP तो भरून आपली नोंदनी पूर्ण करावी लागेल.
- पुढे, नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी जतन करून दर वर्षी या नोंदनीकृत फॉर्म ची गरज भासते.
पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी
पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधून पाहण्यासाठी तुमच्या कडे काही महत्वाची माहिती तुमच्या समोर असणे गरजेचे आहे कारण यादी तपासताना तुम्हाला otp येतील आणि तो तत्काल समाविष्ट करावा लागतो.
- पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधून पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. किंवा आधार नंबर असेल तरी चालेल. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सोबत आपल्या आधार कार्ड शी बँक शिडिग असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते सिडिग नसेल तर तुम्ही हा लेख वाचून कोणते बँक अकाऊंट सिडिग आहे हे तपासू शकता.
- सोबत आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर जवळ असणे गरजेचं आहे. ( otp समाविष्ट करण्यासाठी )
- पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्या. पी एम किसान योजना
- वेबसाइट च्या मुख्य पेज भाषा बदलून मराठी करून घ्या.
- वेबसाइट च्या मुख्य पेज वर स्क्रोल करून खाली या.
- सर्वात खाली उजव्या हाताला लाभार्थी यादी नावाचा एक बॉक्स असेल त्यावर क्लिक करून नवीन पेज वर जा.
- वेबसाइट च्या नवीन पेज वर आपल्याला काही माहिती समाविष्ट करावी लागेल.
- आपल्या राज्याची निवड करावी , पुढील बॉक्स मधून आपल्या जिल्ह्याची निवड करावी , त्यानंतर च्या बॉक्स मधून उपजिल्हा ची निवड करावी (उपजिल्हा हा तुमचं तालुका असेल ) . त्यानंतरच्या बॉक्स मध्ये आपल्या तालुक्याची निवड करावी , आणि शेवटी तुमच्या गावाची निवड करावी.
- वरील सर्व माहिती समाविष्ट केल्यानंतर पुढील बॉक्स मध्ये गेट रीपोर्ट (Get report) नावचे बटन दाबावे.
- तुमच्या समोर तुमच्या संपूर्ण गावाची पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधू येईल .
हे ही वाचा