Farmer ID Card :- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनुसार २०२५ मध्ये देशामध्ये ७० आणि राज्यामध्ये ६० लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे आणि त्यामुळे आजही देशाचा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या कणा म्हणून ओळखले जाते. या शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलेले आहे. ‘फार्मर आयडी’( Farmer ID Card) तयार करण्याचे अभियान चालू करण्यात आले आहे . या आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी संकलित केली जाईल. त्याचा शेतकरीवर्गास कसा फायदा होईल, योजनांचा लाभ कसा घेता येईल आणि फार्मर आयडी मिळवण्याची अर्ज कसा करावा व कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सर्वसमावेशक माहिती एकाच ठिकाणी खाली दिली आहे.

फार्मर आयडी नेमकी काय आहे
फार्मर आयडी हे एक ओळख पत्र असून ते शेतकऱ्यांना शेतकरी असल्याची ओळख देणे सोबत शेतकऱ्याचे त्याची शेती संबंधित माहिती एका डिजिटल ठिकाणी साठवून ठेवण्यास मदत करणे. जेव्हा शेतकरी अर्ज प्रकिया पूर्ण करेल तेव्हा त्यांना एक अद्वितीय आयडी तयार होईल त्या आयडीमध्ये शेतकऱ्याची सर्व आवश्यक माहिती – जसके त्यांचे नाव, पत्ता, जमीन मालकीची माहिती, पिकांची माहिती, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व शेतीशी निगडित माहिती एकत्रित केल्या जातील. भारत सरकारच्या ‘ॲग्रीस्टॅक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा हा एक महत्वाचा भाग आहे. ॲग्रीस्टॅक हा शेती क्षेत्रासाठी तयार केलेला डिजिटल प्लॅटफॉर्म असून ज्याद्वारे शेतकऱ्यांना विविध डिजिटल सेवा पुरवल्या जाणार आहेत .
फार्मर आयडी ची गरज का भासली?
देशातील बहुतेक पात्र शेतकरी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. त्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध अर्ज त्यांना करावा लागतो योजनेसाठी त्यांना वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात, हे सर्व कागदपत्रे तयार करण्यासाठी शासनाच्या अनेक कार्यालयास भेट द्यावा लागतो ह्या संपूर्ण प्रकियामध्ये शेतकरी वर्गास खूप त्रास सहन करावा लागतो, बहुतेक वेळा कागदपत्रे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे सुद्धा द्यावे लागतात. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो होता. पण आहे आता तस होणार नाही असा विश्वास केंद्र शासनाने जाहीर केला आहे.
- पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी लाभ घेण्यासाठी वेगवेगळी , वेळोवेळी कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.
- शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने त्या कागदपत्रे हाताळण्यास खूप सोपे जाईल.
- सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे सोपे होईल, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यास खूप मोठी मदत होईल.
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी पाहता येईल.
- राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजनाचा अतिशय कमी वेळात लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहचेल. त्यामुळे शेकऱ्याला त्याची योग्य वेळी शेतीसाठी उपयोग करतां येईल .
फार्मर आयडीचे प्रमुख उद्देश
- माहिती एका ठिकाणी : देशभरातील शेतकऱ्यांची सर्व शेतीविषयक माहिती एका केंद्रीय डेटाबेसमध्ये संकलित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून त्यामुळे सरकारला शेती क्षेत्राशी संबंधित धोरणे आखणे नवनवीन योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे सोपे होईल. व जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देता येईल .
- सरकारी योजनांचा सुलभ लाभ : फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ अधिक सहजपणे आणि पारदर्शकतेने मिळू शकेल. उदाहरणार्थ, पीएम किसान सन्मान निधी, फसल बीमा योजना, कृषि सिंचाई योजना इत्यादी योजनांसाठी नोंदणी करणे आणि संबंधित लाभ अतिशय सुलभ पद्धतीने मिळेल .
- कागद वरील जास्त अवलंबून राहावे लागणार नाही : डिजिटल आयडीमुळे (अकाऊंट मुले ) शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी कागदपत्रे (कागद स्वरूपात) सादर करण्याची गरज राहणार नाही. त्यांच्या आयडीमध्ये सर्व आवश्यक माहिती आधीच उपलब्ध असेल , शासकीय अधिकाऱ्यास फक्त आयडी घ्यावे लागेल .
- डिजिटल शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे :फार्मर आयडी हा देशातील शेती क्षेत्राच्या डिजिटलीकरणाचा एक महत्त्वाचे पहिले पाऊल आहे. यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. त्यामुळे त्यांना अतिशय सोप्या आणि कमी वेळेत शासकीय योजनेचा लाभ मिळेल .
Farmer ID Card कुणाचा काढता येईल
- जमिनीचा मालक : अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- सातबारा उतारा : अर्जदाराचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदलेले असणे आवश्यक आहे.
- स्थायी निवासी : अर्जदार त्या राज्याचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील फार्मर आयडीसाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा).
- वरील तिन्ही प्रकारातील शेतकरी स्वतःची फार्मर आयडी तयार करू शकतात.
फार्मर आयडीसाठी नोंदणी कशी करावी?
फार्मर आयडी नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. शेतकरी ऑनलाइन पद्धतीने खालील पायऱ्यांचे पालन करून प्रकिया पूर्ण करू शकतात .
- आपल्या जवळच्या शितू सिविधा केंद्रास भेट द्या किंवा ओळखीचा असेल तर फोन करून सुद्धा तुमचे काम पूर्ण होईल.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या : फार्मर आयडी नोंदणी या लिंकवर किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- Login with CSC : वर क्लिक केल्या नंतर एक नवीन page ओपेन होईल. त्यामध्ये csc चा login id आणि पासवॉर्ड टाकून लॉगिन करा.
- आधार वरून नोंदणी :- आधार नंबर टाकून OTP टाकून तुमचे खाते उघडून घ्या.
- नोंदणी फॉर्म भरा : आवश्यक सर्व माहिती भरा – नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, जमिनीची माहिती इत्यादी.
- कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, सातबारा उतारा, जमीन मालकीचे प्रमाणपत्र इत्यादी – अपलोड करा.
- मराठी नावाची नोंदणी : दोन ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव मराठी भाषेमध्ये भरावे लागेल.
- OTP टाकून नोंदणी पूर्ण करणे :- पूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी एक OTP टाकून तुमची अर्ज प्रकिया पूर्ण होईल लगेच तुमचं आयडी तयार असेल आणि संबधित कार्ड तुमच्या पत्यावर पोचवण्यात येईल.
सध्या या प्रक्रियेसाठी फक्त csc (कॉमन सर्व्हिस सेंटर) ची मदत घेणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकरी स्वतः घरबसल्या या आपला अर्ज करू शकतो.
फार्मर आयडी कसे डाउनलोड करावे?
अर्ज मंजूर झाल्यानंतर, शेतकरी त्यांचे फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करू शकतो त्यासाठी पुढील पायरींच्याचा वापर करवा.
- अधिकृत वेबसाइटवर जा.
- लॉगिन करा.
- ‘फार्मर आयडी डाउनलोड करा’ या पर्यायावर क्लिक करा.
- डाउनलोड केलेल्या फाइलची प्रिंट वर क्लिक करून save करा. किंवा प्रिंट काढा.
या लेखमधून “पैसे कमवायचे मार्ग” टीमच्या लेखनातून शेतकरी बांधवानो फार्मर आयडी आजच करा अर्ज आणि अनेक योजनेचा लाभ घ्या .Farmer ID Card व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group –“शासकीय नोकरी & योजना ग्रुप” – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे ही वाचा