कोरोंना च्या महामारी नंतर मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे घरातील एक व्यक्तीच्या कुटुंबावर घर चालवणे आता अवघड झाले आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात जीवन जगणे अतिशय सोपे होते, पण आता महागाई मुळे ते तेवढे सोपे राहिले नाही. घरातील पुरुषाबरोबर महिलाना जारी छोटा मोठा व्यवसाय केला तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिति सुधारेल आणि सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हायला मदत होईल. आज या लेखातून महिलांसाठी घरगुती व्यवसाय ज्यामधून महिला कमवू शकता लाखों रुपये.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय ची गरज काय आहे ?
सध्या महागाई मुळे बहुतेक कुटुंबे अडचणीत आले आहेत कारण आज दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागत आहे, पूर्वी शिक्षण आणि आरोग्य साठी एवढा खर्च लागत नव्हता, रोजच्या लागणाऱ्या वस्तु सुद्धा एवढ्या महाग नव्हत्या , लोक जास्त प्रवास करत नव्हते, जे शेतात पिकल तेच त्याचा प्रथम आहार होता आणि शेतीमध्ये सुद्धा घरगुती लागणाऱ्या अन्नधान्य चे पीक घेत होते पण मागील काही वर्षापासून शेतीमध्ये जी पीक घेतल्या जात आहेत ते फक्त आर्थिक लाभासाठी घेतल्या जात आहेत आणि घरात लागणाऱ्या रोजच्या अन्नधान्य हे मार्केट मधून विकत घेऊन खाल्ले जात आहे. आज शिक्षणासाठी खूप खरंच लागत आहे. दैनंदिन जीवनातील सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत त्यामुळे कुटुंबातील एक व्यक्तीच्या उत्पन्नावर घर चालत नाही अश्या वेळी काही घरगुती व्यवसाय चालू केला तर हातभार लागेल आणि आर्थिक सहकार्य लाभेल सोबत आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होतील, महिलांमध्ये आर्थिक उन्नती होऊन महिला सबलिकरण होण्यास मदत होईल.
महिलांसाठी घरगुती व्यवसायाची गरज काय आहे याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- स्वावलंबन :- अनेक महिलांना घरातून बाहेर पडून नोकरी किंवा इतर कामे करणे शक्य नाही , अशा वेळी महिलानी घरगुती व्यवसाय त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत करतो. त्याचबरोबर स्वतःचे निर्णय घेण्याची आणि आपल्या पैशाचे नियोजन करण्याची ताकद मिळते.
- आर्थिक आधार :- कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. अपघात, आजारपण किंवा इतर अचानक आलेल्या आर्थिक अडचणीमध्ये आर्थिक आधार होतो.
- समाधानाची भावना :- आपल्या आवडीचे काम करण्याची, आणि स्वतः काहीतरी करून दाखवल्याचे मानसिक समाधान लाभते, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मविश्वास वाढत जातो व त्यामुळे समाधानाची भावना येते जे आत्मिक सुख देऊन जाते.
- लवचिकता :- महिलाना घरगुती व्यवसाय का करावा याचे सर्वात मोठे कारण हे आहे की तुम्ही तुमचे काम तुमच्या वेळेनुसार करू शकता तुमच्यावर कोणतेही कुणाचेही व बंधन नसते, घरातील रोजच्या जबाबदारी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींना समतोल राखू शकता. ही मुभा महिलाना नोकरी करताना कधीच मिळणार नाही.
- समाजात प्रतिष्ठा :- स्वतःचा छोटा किंवा मोठा व्ययसाय स्वतःच्या पायावर उभा केल्यानंतर महिलाना स्वावलंबी महिला म्हणून समाजात एक वेगळी ओळख आणि मान मिळतो.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करण्याचे महत्वाचे फायदे:
- गुंतवणूक :- बहुतेक घरगुती व्यवसायासाठी कमी गुंतवणुक करून सुरू करता येतात.
- लवचिकता :- आपल्या सोयीनुसार आणि वेळेप्रमाणे काम करण्याची मुभा असते व कोणतेही बंधन नसते.
- कमी खर्च :- ऑफिस किंवा दुकानाचा खर्च लागत नाही त्यामुळे भांडवल सुद्धा जास्त लागत नाही.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय निवड काशी करावी
- तुमची आवडी व कौशल्यांची ओळख : तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात ? आपल्याकडे कोणती विशेष कौशल्ये आहेत ? ज्याचा उपयोग करून आपण एक छोटा मोठा व्यवसाय उभारू शकतो . या प्रश्नांची उत्तरे शोधून आपण आपल्यासाठी योग्य व्यवसाय निवडू करण्यास मदत होऊ शकते जसकी उदाहरणार्थ, जर तुम्हाला लोणचे व पापड करायला आवडत असतील तर तुम्ही तसा व्ययसाय करू शकता. लिज्जत पापड ही कंपनी आज भारत नाही तर भारताबाहेर आपले उत्पादित माल पोहचवतो त्या कंपनीची सुरुवात एक घरगुती व्यवसायापासून झाली आहे आणि आजही सर्व माल महिला आप आपल्या घरीच बनवतात.
- बाजारपेठेचा अभ्यास : महिलांसाठी घरगुती व्यवसाय निवडत असताना त्या व्यवसाय मार्केट मध्ये किती किंमत आहे , तुमच्या सारखे प्रॉडक्ट किती व्ययसाय तयार करत आहेत त्याची गुणवत्ता काय आहे, आपण काशी गुणवत्ता देणार आहोत याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
- व्यवसायाची गुंतवणूक :महिलांसाठी घरगुती व्यवसाय ची निवड करताना गुंतवणूकिचा विचार करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. आपल्या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल हे ठरवा. आपल्याकडे सध्या किती पैसे आहेत आणि आपल्याला किती पैसा उभा करावा लागेल त्याचा अभ्यास करा सोबत आपण किती पैसे गुंतवू शकता याचा विचार करा. आणि नंतरच तो व्यवसाय चालू करा अस नको व्हायला की खूप मोठी रक्कम तुम्ही कर्ज काढून गुंतवली आणि परतफेड करायला अवघड चालली आहे.
- मार्केटिंग : आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी कराल हे अगोदरच ठरवा. आपण सोशल मीडिया, वेबसाइट किंवा स्थानिक पातळीवर जाहिरात करू शकता कारण आज कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे. माल उत्पादित माल चांगला असेल तर लोंग आपोआप तुमच्या कडे येतील पण त्यासाठी वेळ लागतो.
- कायदेशीर प्रक्रिया :- महिलांसाठी घरगुती व्यवसाय निवड करताना व चालू करताना आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करा. शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र काढून संबधित कार्यालयास भेटून काढून घ्या.
- अडचणींना सामोरे जाण्यास तयार रहा : महिलांसाठी घरगुती व्यवसाय चालू करताना किंवा चालू केल्या नंतर कोणताही अडचणी येऊ शकतात. आपण या अडचणींना सामोरे जाण्यासाठी अगोदर पासून तयारी केली तर जास्त त्रास होणार नाही कारण कोणताही व्यवसाय विना अडचणीचा होऊ शकत नाही. अगोदर पासून तयार नसेल तर निराश होऊन व्यवसाय बंद पडू शकतो.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय मधील काही लोकप्रिय घरगुती व्यवसाय :
- खण्यापिण्याचे व्यवसाय : घरगुती जेवण, मिठाई, पिकल्स, अचार इ. बनवून विक्री करणे.
- हस्तकला व्यवसाय :- हस्तनिर्मित दागिने, कपडे, पेंटिंग्स, मोमबत्त्या इ. बनवून विक्री करणे.
- शिवण व्यवसाय :- कपडे शिवण, ब्लाउज शिवण, बेबी कपडे शिवण इ.
- ब्युटी प्रॉडक्ट्स व्यवसाय :- घरगुती ब्युटी प्रॉडक्ट्स बनवून विक्री करणे.
- ऑनलाइन टीचिंग व्यवसाय :- आपल्याला आलेले विषय ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिकवून पैसे कामवू शकता.
- ब्लॉगिंग व्यवसाय : आपल्या आवडीच्या विषयावर ब्लॉग लिहून पैसे कमवा.
- डेकेअर सेंटर व्यवसाय :- लहान मुलांची काळजी घेणे.
- इव्हेंट प्लॅनिंग व्ययसाय :- लग्न, वाढदिवस इ. सारख्या कार्यक्रमांचे नियोजन करणे.
- फ्रीलांसिंग व्यवसाय :- लेखन, अनुवाद, ग्राफिक डिझाइन इ. काम ऑनलाइन करून पैसे कमवायचे.
- हे काही प्रसिद्ध व्ययसाय आहेत परंतु तुम्ही राहत असलेल्या भागात अजून काही वेगळे व्यवसाय सुद्धा असू शकतात ज्याची तुम्ही निवड करून व्यवसाय करू शकता. व्ययसाय करताना चिकाटी, योग्य वेळी निर्णय घेणे, अपयश पचवणे आणि हताश न होता पुन्हा कामाला लागणे हे काही गुण असतील तर व्ययसाय नक्कीच यशस्वी होतो.
या लेखमधून महिलांसाठी घरगुती व्यवसाय याविषयी सखोल अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा पर्यन्त करण्यात आला आहे. या व्यतिरक्त तुम्हाला अजून काही माहिती अपेक्षित असेल किंवा एखाद्या व्यवसायाची सखोल माहिती व्हावी असल्यास तुम्ही आम्हाला सांगू सकता. सोबत व्यवसाय चालू करण्यासाठी केद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत काही योजना राबवल्या जातात त्याविषयी माहिती व्हावी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये कळवू शकता.